शिवप्रहार न्यूज-“शिवप्रहार” च्या आमरण उपोषणाचा आज ०३ रा दिवस;शहरी भागात अवैध धंदे आले मंदीत तर ग्रामीण भागातील धंदे तेजीत सुरू…
“शिवप्रहार” च्या आमरण उपोषणाचा आज ०३ रा दिवस;शहरी भागात अवैध धंदे आले मंदीत तर ग्रामीण भागातील धंदे तेजीत सुरू…
श्रीरामपूर - श्रीरामपूर शहर व तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्यात यावे याकरिता काही नागरिकांच्या मागणीनुसार “शिवप्रहार प्रतिष्ठान युवा आघाडी”च्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे.गेल्या तीन दिवसापासून चालू असलेल्या या आमरण उपोषणामुळे शहरी भागातील अवैध धंद्यांवर काही प्रमाणात रोख बसला असल्याचे दिसून येत आहे.परंतु ग्रामीण भागात हे धंदे तेजीत चालू आहे.
तसेच दरम्यानच्या काळात काल रात्रीच्या सुमारास श्रीरामपूर उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपोषण कर्त्यांच्या तब्येतीची तपासणी केली आणि काल रात्री अकरा वाजताच्या सुमारास शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.सानप यांनी देखील उपोषणस्थळी भेट दिली.
आजच्या तिसऱ्या दिवशी उपोषणकर्त्यांनी अशी मागणी केली आहे की,बेलापुर रोड वरील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार/कमान येथे मटक्याचा जुगार थाटणार्या मटका माफिया विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा.तसेच सर्व अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा हे आमरण उपोषण असेच सुरू राहील.
आज या उपोषणास ज्येष्ठ पत्रकार मिलिंद कुमार साळवे, हनुमान मंदिराचे मणिलाल पोरवाल ,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महिंद्र त्रिभुवन ,माजी नगरसेवक मल्लू शिंदे ,काँग्रेस नगरसेवक ताराचंद रणदिवे ,कामगार नेते नागेशजी सावंत ,भाजप युवा मोर्चाचे अक्षय वरपे, विशाल यादव,रवी पंडित ,राष्ट्रवादीचे लकी सेठी,मनोज भिसे ,भारतीय लहुजी सेनेचे बाळासाहेब बागुल,प्रहार जनशक्ती पक्षाचे सागर दुपाटी,साजिद शेख,अफरोज पठाण, हिंदूराष्ट्र सेनेचे पियुष बांबरे, आरपीआय युवक आघाडीचे रितेश एडके,बजरंग ग्रुपचे कैलास मस्के,तसेच सामाजिक कार्यकर्ते सतीश फोपसे, एडवोकेट सुभाष जंगले,संपादक इमरान पटेल ,प्रभाकर वाकचौरे ,मनोज यादव, सागर शिंदे ,शरद यमे,निखिल सणानसे, अनिकेत लबडे, विजय शेळके पाटील, गणेश सोनवणे ,हारुणजी शहा अहमदजी जागीरदार, रमेश ढोकचौळे,प्रकाश सोनवणे ,पांडे महाराज ,राजू देवकर ,बाबुराव दाभाडे, यांच्यासह इतर अनेक सर्वसामान्य श्रीरामपूरकरांनी व “शिवप्रहार प्रतिष्ठान” च्या उत्तर नगर जिल्ह्यातील विविध गावांमधील असंख्य मावळ्यांनी या उपोषणास भेट दिली आणि पाठिंबा दर्शविला आहे.