शिवप्रहार न्यूज- बेलापूर येथील जुगार अड्ड्यावर छापा टाकुन 2 लाख 72 हजार रुपयांच्या मुद्देमालासह10 आरोपी ताब्यात;Dysp संदीप मिटके यांच्या पथकाची कारवाई…

शिवप्रहार न्यूज- बेलापूर येथील जुगार अड्ड्यावर छापा टाकुन 2 लाख 72 हजार रुपयांच्या मुद्देमालासह10 आरोपी ताब्यात;Dysp संदीप मिटके यांच्या पथकाची कारवाई…

बेलापूर येथील जुगार अड्ड्यावर छापा टाकुन 2 लाख 72 हजार रुपयांच्या मुद्देमालासह10 आरोपी ताब्यात;Dysp संदीप मिटके यांच्या पथकाची कारवाई…

 (बेलापूर प्रतिनिधी)- दि. 23/12/2021 रोजी Dy.s.p. संदीप मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत बेलापूर येथील सातभाई मळा येथे काही इसम तिरट नावाचा जुगार खेळत आहेत. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी पोलिस अंमलदारांना कारवाई करण्याचे आदेश दिल्याने सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता आरोपी क्र 1) चंद्रकांत राजाराम खरोटे वय 62 वर्ष

 2)प्रवीण कचरू मांजरे वय 29 वर्षे 

 3) दीपक विनायक गायकवाड वय 36 वर्षे 

 4) संजय दिनकर जगताप वय 43 वर्ष

5) सुनील दिगंबर शिंदे वय 38 वर्षे

6) रज्जाक सरदार शेख वय 49 वर्ष

7) गौरव अण्णासाहेब घुले वय 28 वर्षे

8) संजय कचरू राऊत वय 46 वर्ष

9) लक्ष्मण यल्लाप्पा मोरे वय 36 वर्षे

10) ज्ञानेश्वर गोपीनाथ बर्डे वय 38 वर्ष सर्व राहणार बेलापूर तालुका श्रीरामपूर यांचेसह 2,72,000/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून सर्व आरोपी विरुध्द श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन जि.अहमदनगर येथे गु. क्र. 864/2021 मुंबई जुगार कायदा कलम 12( अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

      सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा. डॉ. दिपाली काळे,Dy.s.p संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली स. फौ. राजेंद्र आरोळे पो.ना. शेलार पो. कॉ. रवींद्र माळी, अकबर पठाण, रवींद्र बोडखे, विलास उकिरडे आदींनी केली.

         अवैध धंद्याबाबत श्रीरामपुरात “शिवप्रहार प्रतिष्ठान”च्या वतीने उपोषण करण्यात आले होते.त्यामुळे काही काळ अवैध धंदे बंद होते.परंतु आता पुन्हा नव्या जोमाने गुटखा ,मटका ,जुगार ,बिंगो ,लाँटरी हे अवैध सुरु झाले असुन उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांनी या अवैध धंद्यांना आवर घालावा अशी मागणी नागरीकाकडून केली जात आहे.