शिवप्रहार न्यूज - दानशूर नगरसेवक बिहाणी यांची मदत
दानशूर नगरसेवक बिहाणी यांची मदत ...
*श्रीरामपूर:-श्रीरामपूर येथील नगरसेवक श्रीनिवास बिहाणी यांनी रुग्णालयांसाठी पाच ऑक्सिजन मशीन भेट दिल्या आहेत. बिहाणी यांनी गेल्यावर्षी कोरोनाकाळात उपचारार्थ रुग्णांसाठी धान्य व नाश्त्याच्या सुविधेसह आर्थिक मदत करून मानसिक आधार दिला होता. तसेच लसीकरणासाठी प्रभागातील नागरिकांना रिक्षाची सोय करून देत इतरांसमोर आदर्श ठेवला.
*मागील वर्षीही केली होती मदत*
गेल्यावर्षी कोरोना काळात येथील संत लूक रुग्णालयात १०० बेडचे कोविड सेंटर उभारण्यात आले होते. याठिकाणी उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी सकाळच्या नाश्त्यात बरोबरच जेवणासाठी आवश्यक असलेल्या कडधान्याची व्यवस्था बिहाणी यांनी केली होती.
त्यानंतर जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू झाली. वृद्धांसह ४५ वर्षांपुढील इतर आजार असणाऱ्यांना लस देण्यात सुरुवात झाली. हे लसीकरण ग्रामीण रुग्णालयात असल्याने आपल्या प्रभागातील नागरिकांना लसीकरणासाठी जाण्यास अंतर जास्त होते. ही अडचण लक्षात घेऊन बिहाणी यांनी रिक्षा उपलब्ध करून देत नागरिकांना ने-आणण्याची सोय केली. यामुळे अनेकांनी लसीकरणाचा लाभ घेतला.