शिवप्रहार न्युज - उमेदवाराबाबत निर्णय घेतील हायकमांड;पण चौकाचौकात कार्यकर्त्यांना आली आहे डिमांड...
उमेदवाराबाबत निर्णय घेतील हायकमांड;पण चौकाचौकात कार्यकर्त्यांना आली आहे डिमांड...
श्रीरामपूर -लवकरच होणार असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका नजरेसमोर ठेवून श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात वेगवेगळ्या पक्षाकडून अनेक उमेदवार इच्छुक आहेत. अनेक उमेदवार दोन-तीन वर्षापासून जनसंपर्क वाढवत आहे.तर काही नवखे चेहरे देखील निवडणूक तोंडावर आल्याने मतदारसंघात सक्रिय झाले आहे.
भाजपा ,काँग्रेस ,राष्ट्रवादी शरद पवार ,राष्ट्रवादी अजित पवार ,शिवसेना ठाकरे,शिवसेना शिंदे अशा सर्वच पक्षाकडून उमेदवारांची टिकीटासाठी चाचपणी सुरू आहे.परंतू कोणता उमेदवार निवडायचा ,युती होते ,आघाडी होते की सेपरेट लढतात. या गणितानुसार त्या-त्या पक्षाचे हायकमांड (पक्षश्रेष्ठी)शेवटी आपले उमेदवार ठरवणार आहे .
दुसरीकडे या सगळ्या राजकीय ढवळाढवळीमध्ये चौका-चौकातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला मात्र चांगलीच डिमांड आलेली दिसत आहे.या इच्छुक उमेदवारांना सोबत फिरण्यासाठी दोन-चार कार्यकर्त्यांची गरज असते.त्यामुळे श्रीरामपुरातल्या ह्या चौका-चौकातल्या कार्यकर्त्यांना डिमांड वाढल्याने "अर्थ"पूर्ण असे अच्छे दिन आल्याचे श्रीरामपुरात पाहायला मिळत आहे.