शिवप्रहार न्यूज- कोल्हार मध्ये हातात नंग्या तलवारी घेऊन धर्मांधांचा धुडगूस...
कोल्हार मध्ये हातात नंग्या तलवारी घेऊन धर्मांधांचा धुडगूस...
कोल्हार- राहता तालुक्यातील कोल्हार या गावामध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर काल तलवारी घेऊन धर्मांधांनी धुडगूस घालण्यामध्ये झाले.
याबाबत अधिक माहिती अशी की,काल रात्री एका मोटरसायकलचा धक्का लागण्याच्या कारणावरून दोन गटात वाद झाले होते.त्याचे रूपांतर आज काही धर्मांध मुसलमानांनी एका हिंदू भिल्ल समाजाच्या कुटुंबावर हातात नंग्या तलवारी घेऊन हल्ला चढवला आणि महिलांसोबत गैरवर्तन करून जातीवाचक शिवीगाळ केली.
या प्रकरणाची तक्रार देण्यासाठी या हिंदू समाजाच्या महिला लोणी पोलीस ठाण्यात गेल्या असता लोणी पोलिसांनी या महिलांची तक्रार लवकर नोंदवून घेतली नसल्याची टिका हिंदु समाजाकडून होत
आहे.आज संध्याकाळपर्यंत लोणी पोलिस ठाण्यात या धर्मांध मुसलमानांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम चालु होते .
पोलीसांशी संपर्क साधला असता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.