शिवप्रहार न्यूज- ०पॅरेलेसीसला कंटाळून अशोक यांनी संपवली जीवनयात्रा…

शिवप्रहार न्यूज- ०पॅरेलेसीसला कंटाळून अशोक यांनी संपवली जीवनयात्रा…

पॅरेलेसीसला कंटाळून अशोक यांनी संपवली जीवनयात्रा…

नेवासा (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील अशोक भिमराव जाधव, वय ६४ यांना चार-पाच वर्षांपूर्वी पॅरेलेसीसचा आजार झाला होता. या पॅरेलेसीसच्या आजाराला कंटाळून अशोक भिमराव जाधव यांनी राहत्या घरात खिडकीला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. 

       याप्रकरणी विजय पांडुरंग जाधव, धंदा-शेती, रा. घोडेगाव याच्या खबरीवरून काल सोनई पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सपोनि.चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हेकॉ. आडकित्ते हे पुढील चौकशी करत आहे.