शिवप्रहार न्यूज- तडीपारीची नोटीस बजावण्यासाठी गेलेल्या श्रीरामपूर शहर पो.ठाण्याच्या पोलिसावर प्राणघातक हल्ला…
तडीपारीची नोटीस बजावण्यासाठी गेलेल्या श्रीरामपूर शहर पो.ठाण्याच्या पोलिसावर प्राणघातक हल्ला…
श्रीरामपूर - श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील आरोपी सोमनाथ कुदळे ,राहणार -राऊत वस्ती, अशोकनगर याला हद्दपारची नोटीस बजावण्यासाठी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक किरण पवार हे गेले असता आरोपीने नोटीस स्विकारण्यास नकार दिला आणि त्यानंतर पोलीस नाईक किरण पवार यांच्या मोटरसायकलचे नुकसान करून, शिवीगाळ करून ,त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.
त्यावेळी आरोपीने खोऱ्याचा दांडा उचलून पोलीस नाईक किरण पवार यांच्या डोक्यात जिवे मारण्याच्या हेतुने जोरात मारला. याप्रकरणी पोलीस नाईक किरण पवार यांनी आरोपी सोमनाथ कुदळे याच्या विरोधात तक्रार दिल्यावरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 307,353 इत्यादी कलमान्वये काल रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.