शिवप्रहार न्यूज- राहत्यातुन ०३ अल्पवयीन शाळकरी मुले बेपत्ता…
राहत्यातुन ०३ अल्पवयीन शाळकरी मुले बेपत्ता…
राहाता (प्रतिनिधी) दहावीच्या बोर्डाचा निकाल आणण्यासाठी दोन मित्रांसह बाहेर पडलेला १६ वर्षांचा युवक आपल्या दोन मित्रांसह बेपत्ता झाला आहे.ही घटना राहाता येथे घडली.
राहाता शहरातील खंडोबा चौकातील दीपक विजय मोरे (वय १६), गणेश दिलीप बर्डे (वय १७), किसन रमेश कुऱ्हाडे (वय १७) अशी बेपत्ता असलेल्या अल्पवयीन युवकांची नावे आहेत.या संदर्भात दीपक मोरे याचे वडील विजय पुंडलिक मोरे यांनी राहाता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दि.१७ जून रोजी दीपक विजय मोरे हा दहावीची परीक्षा दिलेला विद्यार्थी सकाळी ७ च्या सुमारास दाहवीच्या बोर्डाचा निकाल आणतो असे सांगून आपल्या मोटारसायकलवरून गेला. ती नवीन मोटारसायकल बिगर नंबरची आहे. होंडा कंपनीची ग्रे रंगाची मोटारसायकलवरून तो आपले मित्र गणेश दिलीप बर्डे व किसन रमेश कुऱ्हाडे यांचेसह बाहेर पडला.परंतू अद्यापर्यंत परत आलेला नाही.