शिवप्रहार न्यूज- ०१ लाख ६८ हजार रुपयांचे मोबाईल बाळगल्याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना श्रीरामपूर पोलिसांनी पकडले...

०१ लाख ६८ हजार रुपयांचे मोबाईल बाळगल्याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना श्रीरामपूर पोलिसांनी पकडले...
श्रीरामपूर - श्रीरामपूर शहरातील मिल्लतनगर वॉर्ड नंबर 1,श्रीरामपूर येथील तलावाजवळ व गौसिया मस्जिद,नवीन घरकुल, वार्ड नंबर 2,श्रीरामपूर येथे दोन अल्पवयीन मुलांना एक लाख 68 हजार रुपयांच्या वेगवेगळ्या मोबाइलसह पोलिसांनी पकडल्याची घटना घडली आहे.
पोलीस शिपाई किशोर जाधव यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, काल सायंकाळी हे दोन अल्पवयीन आरोपी नमूद घटनास्थळावर एक लाख 68 हजार रुपये किमतीचे वेगवेगळे मोबाईल बाळगताना आढळून आले.त्यावेळी मोबाईल बाबत त्यांनी कोणतेही समाधानकारक उत्तर न दिल्याने त्यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 522/2021 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 124 प्रमाणे काल रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक श्री.सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक कारखेले हे तपास करीत आहेत.या दोन अल्पवयीन मुलांपैकी एक मिल्लत नगर, वार्ड नंबर ०१ भागात राहतो तर दुसरा गौसिया मस्जिद, वार्ड नंबर ०२ भागात राहण्यास आहे अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.