शिवप्रहार न्यूज -खासदार सदाशिव लोखंडे यांच्या अंगरक्षकाची झाली बदली ...

शिवप्रहार न्यूज -खासदार सदाशिव लोखंडे यांच्या अंगरक्षकाची झाली बदली ...

खासदार सदाशिव लोखंडे यांच्या अंगरक्षकाची झाली बदली ...

श्रीरामपूर- शिवसैनिकां विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार श्री.सदाशिव लोखंडे यांचे अंगरक्षक पोलीस शिपाई विनोद उंडे यांची राखीव पोलीस दलामध्ये बदली करण्यात आली आहे.

           दोन आठवड्यापूर्वी पढेगाव येथील युवक कार्यकर्ते,नेताजी फाऊंडेशनचे श्री.उदय शिवाजी लिप्टे व त्यांचे सहकारी यांच्यावर खासदार लोखंडे यांचे अंगरक्षक पोलीस शिपाई विनोद उंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी उदय लिप्टे व त्यांच्या सहकाऱ्यांचे असे म्हणणे होते की,आम्ही खासदार श्री.लोखंडे यांच्याकडे रुग्णवाहिकेच्या मागणीसाठी गेलो होतो. परंतु पोलीस शिपाई उंडे यांनी आम्हाला दमदाटी केली व उलट आमच्या विरोधात फिर्याद देवुन गुन्हा दाखल केला.तरी या प्रकरणानंतर पोलीस शिपाई विनोद उंडे यांची राखीव पोलीस दलात बदली करण्यात आल्याचे समजते.