शिवप्रहार न्यूज -मोक्क्याच्या गुन्हयातुन जामीनावर सुटलेल्या १५ गुन्हे केलेल्या श्रीरामपुरातील टोळीप्रमुखासह श्रीरामपुरामधील इतर आरोपींना नगर एलसीबी ने पकडले....

शिवप्रहार न्यूज -मोक्क्याच्या गुन्हयातुन जामीनावर सुटलेल्या १५ गुन्हे केलेल्या श्रीरामपुरातील टोळीप्रमुखासह श्रीरामपुरामधील इतर आरोपींना नगर एलसीबी ने पकडले....

मोक्क्याच्या गुन्हयातुन जामीनावर सुटलेल्या १५ गुन्हे केलेल्या श्रीरामपुरातील टोळीप्रमुखासह श्रीरामपुरामधील इतर आरोपींना नगर एलसीबी ने पकडले....

श्रीरामपूर-याबाबतची अधिक माहीती अशी की,श्रीरामपूर येथुन नगर कडे जाणारा भंगारचा ट्रक पोलीस असल्याची बतावणी करुन दरोडा घालणारी टोळीचा बंदोबस्त स्थानिक गुन्हे शाखेकडुन केला असून पाच आरोपींना जेरबंद केले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे(LCB) पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी दिली.

        या आरोपी मध्ये ०१)तोफीक सत्तर शेख ,वय ३५ वर्ष, रा. काझीबाबा रोड,०२)साजिद खालीद मलीक उर्फ मुनचुन रा. पापाजलाल रोड, वार्ड नं. श्रीरामपुर ,०३)जावेद मुक्तार कुरेशी,रा- बजरंगचौक, श्रीरामपुर , ०४)शाम भाऊराव साळंखे रा. खटकळी , बेलापूर ०५)आरबाज जाकीर मन्सुरी रा. कुरेशी मोहल्ला,श्रीरामपुर यांचा समावेश आहे अन्य दोन आरोपी फरार आहेत.

         दिनांक २७मे २०२१ रोजी फिर्यादी श्रीधर जंगलू सोनवणे, वय ३४ वर्ष ,धंदा -ड्रायव्हर रा. लजपतराय वाडी, एकलहरे, ता. श्रीरामपुर जि.नगर हे त्यांचे ताब्यातील अशोक लेलंड कंपनीचे दोस्त मॉडेलची गाडी नं. एमएच-४२-एम-९४८२ ही मध्ये ४,९१,३२८/- रु. किमतीचे भंगार त्यात पितळ, तांबे,ॲल्युमिनीयम व स्टील असे नगर येथे घेवून जात असतांना शनिशिंगनापुर फाट्याजवळ त्यांना एक पांढच्या इर्टिगा गाडी मधुन ४ इमस येवुन त्यांनी सोनवणे यांना आडवुन आम्ही पोलीस आहोत अशी बातावणी करुन सोनवणे यांना शिवीगाळ, दमदाटी करुन मारहाण केली व त्यास बळजबरीने त्यांचेकडील गाडीत बसवुन त्यांचे अपहरन करुन त्यांना पुढे वरवंडी गावाचे शिवारात आडरानात नेवुन सोडून दिले होते त्यावरुन राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

            सदरचा गुन्हा हा सराईत गुन्हेगार तसेच मोक्याचे गुन्हयात जामीनावर मुक्त असलेला तोफीक सत्तर शेख रा. श्रीरामपुर याने व त्याचे साथीदारांनी मिळुन केला असल्याची खात्रीशिर गुप्त बातमी पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली.         

              त्याप्रमाणे त्यांचे मार्गदर्शनाखाली सदर पथकाने श्रीरामपुर येथे जावुन नमुद आरोपींना शिताफीने अटक केली .

           ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे गुन्हयातील चोरीस गेलेल्या मुद्देमाला बाबत विचारपुस करता त्यांनी सदरचा मुद्देमाल हा रामगड, ता. श्रीरामपुर येथील आयशा टेर्डस, नावाचे भंगारवाला आरबाज मन्सुरी उर्फ पिंजारी यास विकेलेला आहे असे सांगीतले वरुन पथकातील अधिकारी व अमंलदार हे सदर ठिकाणी जावुन आरोपी आरबाज जाकीर मन्सुरी उर्फ पिंजारी वय १९ वर्ष रा. कुरेशी मोहल्ला, सुभेदारवस्ती जवळ, श्रीरामपुर ता. श्रीरामपुर याला देखील ताब्यात घेतले. 

          वरील सर्व पाच आरोपी यांना मुद्देमालासह राहुरी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील कारवाई राहुरी पो.स्टे. करीत आहे. 

             या प्रकारामध्ये पकडलेला आरोपी तोफिक शेख याच्यावर श्रीरामपूर सह आजुबाजु्च्या पो.ठाण्यात 15 गुन्हे दाखल आहेत तर साजिद मलिक मलिक याच्यावर सहा गुन्हे विविध पोलिस ठाण्यांमध्ये दाखल आहे.

           सदरची कारवाई श्री.मनोज पाटील ,नगर पोलीस अधीक्षक, श्रीमती दिपाली काळे ,अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर, श्री.संदिप मिटके, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, सपोनि सोमनाथ दिवटे, पोसई गणेश इंगळे, मनोज गोसावी, पोना सुरेश माळी, पोना विशाल दळवी, दिपक शिंदे, शंकर चौधरी, सागर ससाणे, आकाश काळे, जालिंदर माने , उमाकांत गावडे या पथकाने ही कारवाई केली आहे.