शिवप्रहार न्यूज- “बजरंगनगर”मध्ये मकर संक्रांतीचा सण मोठ्या संख्येने पतंग उडवून जल्लोषात साजरा…

शिवप्रहार न्यूज- “बजरंगनगर”मध्ये मकर संक्रांतीचा सण मोठ्या संख्येने पतंग उडवून जल्लोषात साजरा…

“बजरंगनगर”मध्ये मकर संक्रांतीचा सण मोठ्या संख्येने पतंग उडवून जल्लोषात साजरा…

श्रीरामपूर -श्रीरामपूर नगरपालिकेने शहरातील वार्ड नंबर सात मधील नव्याने नामकरण केलेल्या बजरंगनगर(दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसर) भागामध्ये मकर संक्रांतीनिमित्त पतंग उडवण्याचा उत्सव बजरंगनगर मधील तरुणाईने जल्लोषात साजरा केला.मकर संक्रांतीनिमित्त वर्षानुवर्षांपासून श्रीरामपूर शहरामध्ये सर्वत्र मोठ्या प्रमाणात पतंग उडवण्याचा उत्सव साजरा केला जातो. 

       बजरंगनगर मधील तरुणाईने हीच परंपरा मोठ्या जल्लोषाने पुढे चालू ठेवली.यावेळी आपल्या मैत्रीपूर्ण प्रतिस्पर्ध्यांची पतंग कापताना “घे रे गुंडाळून” “गुले टेकन” “उचल रे ” “हापस रे ” सारख्या घोषणांचा आवाज करून बजरंगनगर मधील तरुणांनी जल्लोष केला.