शिवप्रहार न्यूज -कोपरगाव दौर्यात देवेंद्र फडणवीस यांनी इ-पास काढला होता का ? सामाजिक कार्यकर्त्याचा माहिती अधिकार अर्ज दाखल
कोपरगाव दौर्यात देवेंद्र फडणवीस यांनी इ-पास काढला होता का ? सामाजिक कार्यकर्त्याचा माहिती अधिकार अर्ज दाखल...
कोपरगाव - कोपरगाव शहरात असलेल्या संजीवनी ग्रुप संचलित संजीवनी सेंटरची पाहणी करण्याकरता दिनांक 16/5/2021 रोजी महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते श्री. देवेंद्र फडणवीस हे आले होते. या दौऱ्याच्या वेळेस बऱ्यापैकी गर्दी जमा झाली होती. म्हणून शिर्डी-कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते श्री.संजय भास्करराव काळे यांनी या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव,मुंबई यांच्याकडे माहिती अधिकार अर्ज दाखल केला आहे. या अर्जामध्ये श्री.फडणवीस यांनी जिल्हा ओलांडण्यासाठी आवश्यक असणारा इ-पास काढला होता का ? , १० माणसांपेक्षा जास्त गर्दी करायची नाही मग जी गर्दी जमा झाली त्यासाठी परवानगी होती का ? अशा प्रश्नांची माहिती श्री.काळे यांनी माहिती अधिकारात मागितली आहे. तसेच पोलीस प्रशासन, तालुका प्रशासन व जिल्हा प्रशासन यांनी यासंदर्भात काय कारवाई केली याचा तपशील देखील या माहिती अधिकार अर्जामधे मागविण्यात आला आहे.