शिवप्रहार न्यूज- कोठारींचे दुकान फोडून साडेचार लाखांचा माल चोरला;श्रीरामपूर शहर पो.ठाण्यात गुन्हा दाखल …

शिवप्रहार न्यूज- कोठारींचे दुकान फोडून साडेचार लाखांचा माल चोरला;श्रीरामपूर शहर पो.ठाण्यात गुन्हा दाखल …

कोठारींचे दुकान फोडून साडेचार लाखांचा माल चोरला;श्रीरामपूर शहर पो.ठाण्यात गुन्हा दाखल …

श्रीरामपूर- श्रीरामपूर शहराजवळ असणाऱ्या वडाळा महादेव येथील एसटी स्टँड समोर असलेल्या पारस ट्रेडिंग या नेवासा रोड लगत असलेल्या दुकानांमध्ये चोरी झाल्याची घटना घडली आहे.याबाबत काल तक्रारदार मोहित कोठारी, राहणार- बोरावके नगर,श्रीरामपूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

         या अज्ञात चोरट्यांनी पारस ट्रेडर्स या दुकानाचे शटर व कुलूप तोडून शटर उचकटून आत मध्ये प्रवेश करून सोयाबीन,इलेक्ट्रॉनिक वजन काटा व माल चेक करण्याचे हत्यार असा एकूण चार लाख 56 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

          याप्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक श्री.सानप यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय बोरसे हे करीत आहेत.