शिवप्रहर न्युज - प्रशासनाच्या लेखी आश्‍वासनानंतर मा.तहसीलदार,शहर-तालुका पो.ठाणे मा.PI यांच्या उपस्थितीत “शिवप्रहार”चे आमरण उपोषण मागे…

शिवप्रहर न्युज - प्रशासनाच्या लेखी आश्‍वासनानंतर मा.तहसीलदार,शहर-तालुका पो.ठाणे मा.PI यांच्या उपस्थितीत “शिवप्रहार”चे आमरण उपोषण मागे…

 प्रशासनाच्या लेखी आश्‍वासनानंतर मा.तहसीलदार,शहर-तालुका पो.ठाणे मा.PI यांच्या उपस्थितीत “शिवप्रहार”चे आमरण उपोषण मागे…

 श्रीरामपूर- श्रीरामपूर शहर व तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्यात यावे.याकरिता दिनांक 18 नोव्हेंबर 2021 पासून “शिवप्रहार प्रतिष्ठान युवा आघाडीच्या” वतीने गांधी पुतळा येथे आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते.आज दिनांक 22 नोव्हेंबर 2021 रोजी उपोषणाच्या 05 व्या दिवशी सकाळच्या सुमारास एक उपोषणकर्ते श्री.योगेश सोनार यांची प्रकृती खालावल्याने सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

         ह्या घटनेनंतर प्रशासनाने तात्काळ या आमरण उपोषणाची 05 व्या दिवशी योग्य ती दखल घेतली. श्रीरामपूर चे तहसीलदार मा.श्री.प्रशांत पाटील,श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा.श्री.संजय सानप व श्रीरामपुर तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा.श्री.मधुकर साळवे यांनी तात्काळ उपोषणस्थळी भेट दिली व “ सर्व अवैध धंदे बंद केले असून कोठे अवैध धंदे चालू झाले तर तुम्ही त्या अवैध धंद्यांची माहिती आम्हाला द्यावी आम्ही त्यांच्यावर तात्काळ कारवाई करू” अशा स्वरूपाचे लेखी पत्र चंद्रशेखर(चंदू) आगे यांना प्रशासनाने दिले.

           त्यामुळे आमरण उपोषणाची योग्य ती दखल घेतल्यामुळे व पोलिसांनी लेखी पत्र देऊन कोणी अवैध धंदे चालू केले तर निदर्शनास आणुन द्यावे त्यांच्यावर कारवाई करू असे लेखी पत्र दिल्याने “शिवप्रहार प्रतिष्ठान युवा आघाडी”चे उपोषणकर्ते चंद्रशेखर आगे व दीपक संत यांनी यावेळेस उपोषण मागे घेत असल्याचे सांगितले.यावेळी उसाचा रस उपोषणकर्त्यांना पाजुन प्रशासनाने या उपोषणाला पूर्णविराम दिला.

        दरम्यान साखर कामगार रुग्णालयात दाखल असलेले उपोषणकर्ते शिवप्रहार प्रतिष्ठान चा मावळा श्री.योगेश सोनार यांची प्रकृती स्थिर असल्याचे कामगार रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्री.जगधने यांनी सांगितले आहे.

आज रोजी उपोषण स्थळी स्वर्गीय अप्पासाहेब गांगड मित्र मंडळाच्या वतीने भेट देण्यात आली.