शिवप्रहार न्यूज- नगरला चाललेला श्रीरामपुरातील ट्रक पोलीस असल्याचे सांगुन आरोपींनी पळवला.
नगरला चाललेला श्रीरामपुरातील ट्रक पोलीस असल्याचे सांगुन आरोपींनी पळवला...
श्रीरामपूर -श्रीरामपूर येथे राहणारे श्रीधर जंगलु सोनवणे ,वय 34 ,व्यवसाय -ड्रायव्हर, राहणार -लजपतराय वाडी,एकलहरे गाव,तालुका श्रीरामपूर हे त्यांच्या मालकीचा अशोक लेलँड कंपनीचा ट्रक एम एच 42 एम 9482 मधून स्क्रॅप चे मटेरियल(भंगार) घेऊन श्रीरामपूर येथून अ.नगरकडे नगर -मनमाड रोड ने जात असताना ते धर्माडी टेकडी जवळ,राहुरी विद्यापीठ या ठिकाणी आले.
त्या ठिकाणी चार अनोळखी तरुण विना नंबर ईरटीका गाडी मधून आले आणि त्यांनी पोलीस असल्याची बतावणी करून श्री.सोनवणे यांना त्यांचा ट्रक थांबवण्यास सांगितले.त्यानंतर श्री.सोनवणे यांना ईरटीका गाडी मध्ये बळजबरीने बसवुन त्यातील एक चोरटा श्री.सोनवणे यांचा स्क्रॅप ने भरलेला ट्रक नगरच्या दिशेने घेऊन गेला.इतर आरोपींनी सोनावणे यांना मुळा धरणाच्या परिसरात वरवंडी गावाच्या शिवारात निर्जन स्थळी गाडीतून उतरून ,शिवीगाळ करून ,लाथाबुक्क्यांनी मारहाण करून टाकून दिले.त्यानंतर श्री.सोनवणे हे तेथून पायी चालत राहुरी पोलीस स्टेशनला आले.
या घडलेल्या प्रकारावरून श्री.श्रीधर जंगलु सोनवणे यांनी पोलिसात तक्रार केली.त्यांच्या तक्रारीवरून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 413 /2021 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी ट्रकचालक श्री.सोनवणे यांचे एकूण 5 लाख 66 हजार रुपयांचे नुकसान झालेले आहे.त्यामध्ये अशोक लेलँड कंपनीचा ट्रक आणि जवळपास सतराशे किलोचे स्क्रॅप( भंगार ) यांचा समावेश आहे. हा ट्रक नेमका कोणी चोरून नेला याबाबतचा शोध चालू आहे.