शिवप्रहार न्युज - “शिवप्रहार प्रतिष्ठान”मुळे आदिवासी महिलेचे प्राण वाचले;पोटात मेलेले बाळ डॉक्टरांनी यशस्वीरीत्या काढले… 

शिवप्रहार न्युज - “शिवप्रहार प्रतिष्ठान”मुळे आदिवासी महिलेचे प्राण वाचले;पोटात मेलेले बाळ डॉक्टरांनी यशस्वीरीत्या काढले… 

“शिवप्रहार प्रतिष्ठान”मुळे आदिवासी महिलेचे प्राण वाचले;पोटात मेलेले बाळ डॉक्टरांनी यशस्वीरीत्या काढले… 

श्रीरामपूर - श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर परिसरात राहणाऱ्या एका गरोदर आदिवासी महिलेचे बाळ पोटातच मयत झाल्याचे एका डॉक्टरांनी बुधवारी रिपोर्ट द्वारे या महिलेला सांगितले होते. त्यानंतर खाजगी डॉक्टरांनी सांगितले की,या मयत बाळाला ऑपरेशन करून काढावे लागेल.ही महिला अत्यंत गरीब असल्याने या महिलेच्या नातेवाईकांनी मदतीसाठी अनेक नेतेमंडळींना संपर्क केला.परंतु तिचे काम कुठेच झाले नाही. 

        शेवटी एका नागरिकाने या महिलेसह नातेवाईकांना बेलापूर रोड बजरंगनगर भागातील “शिवप्रहार” च्या कार्यालयात पाठवले. त्यानंतर “शिवप्रहार प्रतिष्ठान”च्या मावळ्यांच्या मदतीने तात्काळ या महिलेला ॲम्बुलन्स व्दारे लोणी येथे PMT रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे “शिवप्रहार प्रतिष्ठान”चे रवींद्र आहेर यांनी तात्काळ सर्व वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली.त्यानंतर डॉक्टरांनी या महिलेला निरीक्षणाखाली ठेवून नुकतेच तिचे ऑपरेशन करुन सदर मयत बाळ यशस्वीरीत्या बाहेर काढले आहे.तसेच या महिलेची प्रकृती देखील सध्या चांगली आहे. 

        या आदिवासी समाजाच्या गरोदर महिलेचे बाळ पोटात मयत झाल्यामुळे तिला जर “शिवप्रहार प्रतिष्ठानच्या “ मावळ्यांची वेळेवर मदत मिळाली नसती.तर या गरीब महिलेसोबत नक्कीच अनर्थ घडला असता.”शिवप्रहार प्रतिष्ठान”ने मांडलेल्या शिवछत्रपतींच्या अठरापगड जातीच्या हिंदुत्वाचा विचारधारेमुळे “शिवप्रहार प्रतिष्ठान”चे मावळे गोरगरिबांची जात पात न विचारता नेहमी गोरगरिबांना मदत करण्यासाठी सदैव तत्पर असतात. आपल्या हातून एका गरीब महिलेचे प्राण वाचले शिवछत्रपतींच्या विचारांना यापेक्षा मोठी आदरांजली दुसरी होऊ शकत नाही.