शिवप्रहार न्यूज- शेतकऱ्याचे मुंबईतील नियोजित उपोषण रद्द; श्रीरामपूरच्या तहसीलदारांनी स्थानिक पातळीवरच सोडवला प्रश्न…

शिवप्रहार न्यूज- शेतकऱ्याचे मुंबईतील नियोजित उपोषण रद्द; श्रीरामपूरच्या तहसीलदारांनी स्थानिक पातळीवरच सोडवला प्रश्न…

शेतकऱ्याचे मुंबईतील नियोजित उपोषण रद्द; श्रीरामपूरच्या तहसीलदारांनी स्थानिक पातळीवरच सोडवला प्रश्न…

 श्रीरामपूर -श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव येथील शेतकरी श्री.थोरात यांची जमीन अनेक वर्षांपासून खंडकरी माध्यमातून शेती महामंडळाच्या ताब्यात होती.1980 पासून शासनाकडे मागणी करत श्री.थोरात यांनी त्यांची खंडकरी जमीन वाटपात मिळवली होती.

       परंतु प्रत्यक्ष ताब्यात वाटणी पत्र होऊन मूळ जमिनीपेक्षा कमी जमीन आल्यामुळे खंडकरी शेतकरी श्री.थोरात यांनी मुंबई मंत्रालयासमोर उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता.परंतु श्रीरामपूर तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार श्री.प्रशांत पाटील यांनी त्यांचा प्रश्न स्थानिक पातळीवर सोडवून त्यांच्या हक्काची जमीन त्यांना मिळवून दिली. 

       त्यामुळे या शेतकऱ्याने आनंद व्यक्त करत तहसीलदार श्री.पाटील यांचे आभार मानून उपोषणाचा निर्णय रद्द केला.यावेळी तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री.शेख यांनी खंडकरी शेतकरी थोरात यांना मदत केली.