शिवप्रहार न्यूज- पोलीस असल्याचे सांगून बेलापूर बायपासला ज्येष्ठ नागरिकाला फसवले...
पोलीस असल्याचे सांगून बेलापूर बायपासला ज्येष्ठ नागरिकाला फसवले...
श्रीरामपूर- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बायपास रस्त्यावर ज्येष्ठ नागरिक गोरक्षनाथ रामभाऊ कुर्हाडे, वय 65 वर्ष यांना गोतराज कुशन वर्क भागात दोन आरोपींनी विना नंबर पल्सर दुचाकीवरून येवुन पोलिस असल्याचे सांगून फसवल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,आरोपींनी ज्येष्ठ नागरिक कुर्हाडे यांना खोटे पोलीस ओळखपत्र दाखवून व तुमच्याकडे गांजा आहे असा आरोप करून त्यांची अंगझडती घेत असताना त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी हातातून काढून रुमालामध्ये ठेवली व हातचालाकी मध्ये कुर्हाडे यांच्या अंगठी घेऊन गेले.
याप्रकरणी दोघा आरोपींविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पोलीस निरीक्षक श्री.सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक श्री. सुरवाडे हे पुढील तपास करीत आहेत.