शिवप्रहार न्यूज- अशोक कारखाना परिसरात 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला “अमोल”ने पळवले…

अशोक कारखाना परिसरात 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला “अमोल”ने पळवले…
श्रीरामपूर- श्रीरामपूर तालुक्यातील अशोक कारखाना परिसरातून आरोपी अमोल माणिक जगधने याने एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीस तिच्या राहत्या घरातून पळवून नेले.
या प्रकरणी काल 24 फेब्रुवारी रोजी रात्री उशिराने आरोपी अमोल जगधने याच्या विरोधात पीडित मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात आरोपी व पीडित मुलीचा शोध घेण्याचे काम तपासी अधिकारी पीएसआय सुरवडे हे पोलीस निरीक्षक सानप यांच्या मार्गदर्शनाखाली घेत आहेत.