शिवप्रहार न्यूज -श्रीरामपूरच्या पसायदान कोविड सेन्टर  मध्ये 80 90 ॲाक्सीजन असलेल्या 74 वर्षीय आजी कोरोनाशी लढून ठणठणीत बऱ्या होऊन घरी परतल्या

शिवप्रहार न्यूज -श्रीरामपूरच्या पसायदान कोविड सेन्टर   मध्ये 80 90 ॲाक्सीजन असलेल्या 74 वर्षीय आजी कोरोनाशी लढून ठणठणीत बऱ्या होऊन घरी परतल्या

श्रीरामपूरच्या पसायदान कोविड सेन्टर 

मध्ये 78-60 ॲाक्सीजन असलेल्या 74 वर्षीय आजी कोरोनाशी लढून ठणठणीत बऱ्या होऊन घरी परतल्या ...

श्रीरामपूर -

श्रीरामपुरातील पुजारी आजी हॉस्पिटल ला दाखल झाल्या तेव्हा ऑक्सिजन पातळी अगदी ७८-८० ,HRCT स्कोअर १६,

वय ७४ वर्षे,श्वास घ्यायला त्रास, खोकला, अशक्तपणा आणि ताप अशी लक्षणे होती.

         त्यावेळी नातेवाईकांनी रुग्णाची संपूर्ण जबाबदारी हॉस्पिटल मधील स्टाफ वर सोपविली आणि पुढील औषधोपचार सुरू करण्यात आले.

        डॉ. सत्यजित निघुते(MD) यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रीटमेंट सुरू झाली आणि आजींनी सुद्धा औषधोपचारास तितक्याच बरोबरीने प्रतिसाद दिला!

        त्या दरम्यान रेमडेसिवीरचा तुटवडा, ऑक्सिजनचा तुटवडा आहे तरीही आहे त्या उपलब्ध औषधांचा वापर करून केंद्राचे मार्गदर्शक डॉ. रवींद्र कुटे (MS,), डायरेक्टर डॉ. मयुरेश कुटे(MBBS,RMO, ), डॉ. मृण्मयी कुटे(MBBS), डॉ. सूरज गोरे(BHMS), डॉ. शिवदास पवार(BHMS), डॉ. नरेंद्र हिंगणे(BHMS), सौ. नलिनी रविंद्र कुटे(व्यवस्थापन) 

तसेच स्टाफ परिचारिका शोभा, विद्या मुन्तोडे व प्रितेश मुन्तोडे आणि किशोर धिवर आदींनी वैद्यकीय कौशल्याचा वापर करून आजींना सात दिवसांत बरे केले. आजींनी ०७ दिवसात कोरोनावर विजय मिळवला. त्या ठणठणीत बरे झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून पुढील आरोग्यासाठी शुभेच्छा देत सन्मानपूर्वक घरी सोडण्यात आले.