शिवप्रहार न्यूज- चोख व्यवस्था आणि कर्तव्यदक्षता यासाठीभारतीय गुप्तचर विभागाकडून शिर्डीतील तीन आधिका-यांचा गौरव..
चोख व्यवस्था आणि कर्तव्यदक्षता यासाठीभारतीय गुप्तचर विभागाकडून शिर्डीतील तीन आधिका-यांचा गौरव..
शिर्डी(प्रतिनिधी)-शिर्डीतील चोख व्यवस्था आणि कर्तव्यदक्षता यासाठी भारतीय गुप्तचर विभागाकडून शहरातील तीन आधिका-यांना प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य गुप्तचर महासंचालक आझाद चंद्रशेखर यांचे हस्ते साईमंदिर सुरक्षा प्रमुख आण्णासाहेब परदेशी , वाहतूक शाखा पोलिस निरीक्षक ह्रिरालाल पाटील आणि शिर्डी पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक गुलाबराव पाटील अशा तिघांना प्रशस्तीपत्रक देवून गौरवण्यात आले. तर पोलिस उपअधीक्षक संजय सातव यांनी महासंचालक आझाद चंद्रशेखर यांचा सत्कार केला.
शिर्डी शहरात भाविकांची नेहमीच मोठा वर्दळ असते. यातच शहरातील रस्त्यांवर आणि ठिकाणी पोलिसांनी उत्तम कामगिरी केली असल्याचं दिसून आलं आहे. शहरातील गुन्हेगारी, चैनस्नॅचिंग, घरफोड्या तसेच गुन्हे रोखण्यात शिर्डी पोलिसांना चांगले यश संपादन झाले आहे. तर शहरातील वाहतूकीची कोंडी सोडवताना वाहतूक शाखेन उल्लेखनीय कामगिरी बजावत वर्षाकाठी साधारण दिड कोटी दंड वसूल केला आहे. अशा कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून पीआय गुलाबराव पाटील व पीआय हिरालाल पाटील यांना गुप्तचर विभागाकडून सन्मानित करण्यात आले आहे.
साई मंदिरातील सुरक्षा व्यवस्था, भाविकांच्या मोठ्या गर्दीत देखिल योग्य नियोजन अशा कामासाठी साईसंस्थानचे सुरक्षा विभाग नेहमीच तत्पर असते. आलेल्या भाविकांना साई दर्शना बरोबर त्यांची सुरक्षा यासाठी सुरक्षा विभागाचे आधीकारी तसेच कर्मचारी नेहमीच झटत असतात. संस्थानच्या मुख्यकार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत तसेच विश्वस्त मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत चोख सुरक्षा व्यवस्था यासाठी गुप्तचर विभागाकडून साईसंस्थानचे सुरक्षा विभाग प्रमुख पीएसआय आण्णासाहेब परदेशी यांना प्रशस्ती पत्रक देत सन्मानित करण्यात आहे.