शिवप्रहार न्यूज- सकाळी-सकाळी कत्तलीसाठी चालवलेल्या गाईचे “शिवप्रहार”च्या मावळ्यांनी वाचवले प्राण…
सकाळी-सकाळी कत्तलीसाठी चालवलेल्या गाईचे “शिवप्रहार”च्या मावळ्यांनी वाचवले प्राण…
श्रीरामपूर - श्रीरामपूर शहरातील बेलापूर रोडवर बजरंगनगर परिसरामध्ये एका गाईला कत्तलीच्या उद्देशाने श्रीरामपुरात आणत असल्याची माहिती शिवप्रहार प्रतिष्ठानच्या मावळ्यांना समजली.त्यानुसार तात्काळ श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक गोसावी ,पोलीस कॉन्स्टेबल बडे,पोलीस कॉन्स्टेबल नरवडे यांना याबाबत माहिती देण्यात आल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
यावेळी त्यांनी वाहन क्रमांक एम एच 12 एलटी 8372 टाटा जीप हे वाहन पंचांसमक्ष ताब्यात घेऊन आरोपी तोसिफ सलीम तांबोळी,वय 22 वर्ष,राहणार-पढेगाव,तालुका श्रीरामपूर याला देखील ताब्यात घेतले.या प्रकरणात एकूण 01 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे व आरोपी विरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम व प्राण्यांना कृतीने वागवणे अधिनियम प्रमाणे पोलीस निरीक्षक श्री.सानप यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान मावळंयानी कत्तलीपासून वाचवलेल्या गाईला श्रीरामपूर शहरातील पशुवैद्यकीय चिकित्सालय येथे योग्य ते उपचार केले.त्यानंतर गाईची रवानगी संगमनेर येथील गोशाळेमध्ये प्रशासनाच्या मदतीने मावळ्यांनी केली. आपल्याला गोरक्षणाचा वारसा अठरापगड जातीच्या मावळ्यांचे दैवत, युगप्रवर्तक-युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिलेला आहे.त्यामुळे आपण या वारशाचे जतन करणे आवश्यक आहे. नुसतेच घरात- दुकानात शिवाजी महाराजांचे फोटो लावून हा वारसा जतन होणार नाही.