शिवप्रहार न्यूज- निपाणी वडगाव परिसरात दौंड वस्ती येथे चाकूचा धाक दाखवत दरोडा;साडे ०९ तोळे सोने व १ लाख ३५ हजार रोकड लुटली...
निपाणी वडगाव परिसरात दौंड वस्ती येथे चाकूचा धाक दाखवत दरोडा;साडे ०९ तोळे सोने व १ लाख ३५ हजार रोकड लुटली...
श्रीरामपूर - तालुक्यातील निपाणी वडगाव येथील दौंड वस्ती परिसरात रात्री दोन ते अडीचच्या सुमारास पाच दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवत तसेच घरातील व्यक्तींना वेठीस धरत घरातच सामानाची उचकापाचक करत १ लाख ३५ हजार रोख व साडेनऊ तोळे सोने असा ऐवज लुटला आहे.
येथील मा.वनाधिकारी श्री.दौंड तसेच निपाणी वडगाव येथील माजी सरपंच आशिष दौंड याच्या घरावर हा दरोडा पडला.त्यांना लगेच घटनेची माहिती परिसरातील नातेवाईक यांना फोन वरून कळवली. यावरून परिसरात नातेवाईक व शेजारी यांच्या मदतीने चोरट्यांचा शोध घेतला असता चोरट्यांनी तात्काळ धूम ठोकली.
यावेळी श्री. दौंड यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे याठिकाणी कळविले त्यावरून अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.दीपाली काळे, ,डीवायएसपी श्री.संदीप मिटके, पोलीस निरीक्षक संजय सानप तसेच पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे, नाईक संजय दुधाडे दत्तात्रय दिघे ,पो कॉ किरण पवार, किशोर जाधव, सुनील दिघे ,पंकज गोसावी ,राहुल नरवडे तसेच नगर येथील एलसीबी पथक देखील आले.
भाजपाचे नेते शिवाजी दौंड यांचे वनाधिकारी श्री.दौंड व आशिष दौंड बंधू व पुतणे असल्याने त्यांनी सदर दरोडेखोरास तात्काळ जेरबंद करावे अशी मागणी केली आहे.