शिवप्रहार न्यूज- व्यापाराच्या अपघाती मृत्यू प्रकरणी वाहन चालका विरोधात गुन्हा दाखल…
व्यापाराच्या अपघाती मृत्यू प्रकरणी वाहन चालका विरोधात गुन्हा दाखल…
श्रीरामपूर- शहरातील व्यापारी सुभाष भागचंद गांधी यांचे अपघातात दुर्दैवी निधन झाले होते. ही घटना दिनांक 14 एप्रिल 2022 रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली होती. सुभाष गांधी हे मोटारसायकल क्रमांक एम एच 17 झेड 8154 वरुन पुर्नवादनगर रोडने आपल्या घराकडे येत असताना समोरुन येणाऱ्या मोपेड क्र.एम एच 16 बी डी 21 वरील चालकाने त्यांना रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून जोराची धडक दिली होती.
याप्रकरणी मयत सुभाष भागचंद गांधी यांचा मुलगा सागर सुभाष गांधी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अपघातातील मोपेड गाडी क्रमांक एम एच 16 बी डी 21 वरील चालक याच्या विरोधात भादवि कलम 304-A, 279, 427, वाहन अधिनियम 177, 184 प्रमाणे गुन्हा रजि. नंबर 284 दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलिस करत आहे. अपघात होताच मोपेड गाडी चालकाने घटना स्थळावरुन पळ काढला होता.