शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर तालुक्यातील जिल्हा बॅंक शाखेत सेफ्टी सायरन वाजला;गावभर चर्चा…

श्रीरामपूर तालुक्यातील जिल्हा बॅंक शाखेत सेफ्टी सायरन वाजला;गावभर चर्चा…
माळवाडगाव- काल बुधवार दि. २२ रोजी रात्री ८.२० च्या दरम्यान पाऊस सुरू असताना माळवाडगांव जिल्हा बँक शाखेचा तिजोरीशी संबंधित धोक्याचा सायरन वाजू लागला अन् गावात एकच धांदल उडाली.
पाऊस सुरू झाला कि,गावात सिंगल फेज लाईट ये-जा करणार हे निश्चित असते.काल रात्री ८.३० वा च्या सुमारास नगर जिल्हा बँक माळवाडगाव शाखेचा धोक्याचा सायरन अचानक वाजू लागला. आजूबाजुच्या नागरिकांनी सावधानतेचा इशारा म्हणून मोबाईलवर इतरांना कळविले.
दरोड्याच्या भितीने बँकेच्या इमारतीजवळ कुणीही फिरकेना.शेवटी स्थानिक लोकांनी इतरांच्या मदतीने इमारतीच्या मागे पुढे जाऊन दरोडेखोर नसल्याची खात्री करून घेत स्थानिक कर्मचारी यांना कळविले. रात्री ८.४५ वाजता बँक उघडून खात्री केल्यावर तिजोरीच्या वायरिंग जवळ पाल अडकल्याचे आढळून आले. तेव्हा कळाले पालीमुळे सायरन वाजला आणि सगळ्यांची धांदल झाली.