शिवप्रहार न्यूज- तलवार,काठ्यांनी मारहाणीत कुऱ्हाडे गंभीर जखमी;०८ जणांविरोधात गुन्हा दाखल…

शिवप्रहार न्यूज- तलवार,काठ्यांनी मारहाणीत कुऱ्हाडे गंभीर जखमी;०८ जणांविरोधात गुन्हा दाखल…

तलवार,काठ्यांनी मारहाणीत कुऱ्हाडे गंभीर जखमी;०८ जणांविरोधात गुन्हा दाखल…

 श्रीरामपूर- तालुक्यातील खिर्डी गावात कमानीजवळच किरकोळ कारणावरुन दोन गटात तलवारीने, काठयांनी मारहाण झाली. यात चार जण जखमी असून श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात ८ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील खिर्डी गावात मयुर राजेंद्र कुऱ्हाडे हा त्याच्या कामगार मित्रांसह सेंट्रींग कामाचे नियोजन करत असताना त्या ठिकाणी तान्हाजी सोनाजी बनसोडे, शुभम बनसोडे, अमोल बनसोडे, सुभाष रावसाहेब बनसोडे, सुनील किशोर साळवे व अन्य तीन जण त्या ठिकाणी आले. काहीही कारण नसताना शिवीगाळ करून वाद घालू लागले. त्यावेळी मयुर राजेंद्र कुऱ्हाडे व त्याचे साथीदार शिवीगाळ करु नका असे सांगण्यास गेले असताना त्याचेवेळी या सर्वांनी तलवार व काठ्यांनी मारहाण केली. या मारहाणीत तिघेजण जखमी झाले. असून त्यांना येथील साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेने गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

           यात मयूर भाऊसाहेब कुऱ्हाडे (वय ३०), भाऊसाहेब देवराम कुऱ्हाडे (वय ६०), अक्षय अनिल गायकवाड (वय २५) व संदीप अंबादास गायकवाड (वय ३८) व भाऊसाहेब देवराम कुऱ्हाडे अशी जखर्मीची नावे असून ते सर्व कोपरे (ता. राहरी) येथील आहेत. यातील भाऊसाहेब देवराम कुऱ्हाडे यांची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले.

       यावेळी गावातील काही नागरिकांनी वाद करू नका, असे म्हणत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. काही लोक दुचाकींची हवा सोडविण्यासाठी गेले. तेव्हा लोकांनाही मारहाण करण्यात आली. यावेळी दगड, विटा, लाकडी दांडक्यांसह धारदार शस्त्रांचा वापर झाल्याचे समजते.

          दरम्यान या घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे फौजफाट्यासह गावात दाखल झाले. जखमी झालेल्यांकडून या घटनेची खाडे यांनी माहिती घेतली. यावेळी घटनास्थळावरून पोलिसांनी दोन दुचाकींसह अन्य वस्तू तालुका पोलीस ठाण्यात जमा केल्या. मारहाणीचे कारण मात्र स्पष्ट झाले नाही. पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे पुढील तपास करीत आहेत.