शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर (उत्तर नगर) ॲडीशनल एस.पी. पदाचा कार्यभार स्वाती भोर यांनी स्विकारला;डॅा.दिपाली काळे यांची बदली…

श्रीरामपूर (उत्तर नगर) ॲडीशनल एस.पी. पदाचा कार्यभार स्वाती भोर यांनी स्विकारला;डॅा.दिपाली काळे यांची बदली…
श्रीरामपूर - श्रीरामपूर विभागाच्या (उत्तर नगर जिल्हा) अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर दिपाली काळे यांची बदली नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अकादमीत पोलीस अधीक्षकपदी करण्यात आल्याने त्यांच्या जागी बीडमधील आंबेजोगाई येथील अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
स्वाती भोर यांनी यापूर्वी नगर जिल्ह्यातील संगमनेर येथे उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून उत्कृष्ट काम केलेले आहे.आंबेजोगाई येथे देखील कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी म्हणून त्यांची कारकीर्द होती.
आज गुरुवार दिनांक 20 जानेवारी रोजी स्वाती भोर यांनी दिपाली काळे यांच्याकडून श्रीरामपूर विभागाच्या (उत्तर नगर जिल्हा) अपर पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला.