शिवप्रहार न्यूज-“कोणतं वासरू कोणत्या गाईला पितं आम्हाला माहिती आहे” हप्ता वसुली वरून पोलीस राऊत व श्रीरामपूर तालुका PI साळवे,पोलीस वैरागर,पोलीस प्रशांत रण्णवरे यांच्यातील वादाची क्लिप वायरल…
“कोणतं वासरू कोणत्या गाईला पितं आम्हाला माहिती आहे” हप्ता वसुली वरून पोलीस राऊत व श्रीरामपूर तालुका PI साळवे,पोलीस वैरागर यांच्यातील वादाची क्लिप वायरल…
श्रीरामपूर- श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी लाचखोरी करताना परवा दिवशी अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकले.ही घटना ताजी असतानाच श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकरराव साळवे व पोलीस शिपाई राऊत तसेच पोलीस शिपाई वैरागर यांच्यामधील लाचखोरी व हप्ते खोरी वरून झालेले शिवीगाळ असलेले संभाषण प्रचंड व्हायरल होत आहे.
या व्हायरल संभाषणात पोलीस निरीक्षक मधुकरराव साळवे यांनी पोलिस शिपाई राऊत याच्यासोबत खालील प्रमाणे संवाद साधला…
Pi साळवे -हॅलो राऊत कुठे आहेत तुम्ही?
पोलीस शिपाई राऊत - साहेब घरी होतो.
Pi-साळवे- ते कोणा लोकांकडून पैसे जमा करू लागले का तुम्ही पुन्हा?
पोशि.राऊत- नाही नाही कोणाकडूनच नाही साहेब माझ्या पोरीचा काल बर्थडे झाला तीची शपथ घेऊन सांगतो कोणाकडेच गोळा करायला जात नाही. वैरागर ने सांगितले ना कोणाकडे जाऊ नका.
Pi- साळवे बरोबर आहे तुम्हाला कलेक्शनचे काम दिलेले नाही तुम्ही का जातात इकडे कोणाकडे जायचे नाही. पो.शि.- राऊत पण वैरागरला पण जायला नका लावू साहेब विनंतीवरून. Pi साळवेे- आरे वैरागर ला कलेक्शन चे काम दिलेले आहे तो जाईल तुम्ही सांगणारे कोण. राऊत- साहेब एका त्याने माझे आईबाप काढले त्याची लायकी आहे का माझ्या पुढं. Pi साळवे -अरे तुमची लायकी आहे का त्याची आहे तुम्ही मला सांगणारे कोण याला नका देऊन त्याला नका देऊ.
राऊत -नाय नाय द्या ना साहेब पण माझ्या आईला का त्याने आई बाई केले. Pi साळवे- अरे तुमचे वैयक्तिक मॅटर मिटवा एकमेकांच्या उरावर बसा माय घाला तिकडे मला नका सांगू. राऊत -मी एसपी साहेबांना रिपोर्टिंग करणार आहे.Pi साळवे -हा समक्ष भेटा. अशा आशयाचे संभाषण पोलीस निरीक्षक मधुकरराव साळवे पोलीस शिपाई राऊत यांच्या मध्ये झालेले आहे.
तसेच पोलीस शिपाई वैरागर व पोलीस शिपाई राऊत यांच्यामध्ये देखील हप्ता वसुली वरून अश्लील शब्द असणारे संभाषण व्हायरल झाले आहे.त्यामध्ये वैरागर राऊत यांना सांगता कि,तू कुठे जाऊ नको तुला चहापाणी देतो तर राऊत म्हणतात, तुम्ही फोन उचलत नाही टायमावर.त्यावर वैरागर म्हणतात, तू कुठे जाऊ नको चार लोक देता १० देत नाही असं होतं तू प्रॅापर आहे. हा रण्णवरे पण प्रॅापर आहे. तु जावु नको ,राऊत-मी जाणार कोणतं वासरु कोणत्या गाईला पितं आम्हाला सगळं माहित आहे अशा आशयाचे संभाषण व्हायरल झाल्याने श्रीरामपूर पोलीस दलात प्रचंड खळबळ माजली असून काही पोलिसांच्या हफ्तेखोरीमुळे जनसामान्यांच्या मनामध्ये पोलिसांबद्दल नकारात्मक प्रतिमा तयार होत आहे.
याच्यावर कर्तव्यदक्ष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर बी.जी.शेखर पाटील व पोलीस अधीक्षक मनोज पाटील काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.