शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामसेवकाने उघड्यावर हागणदारी करणाऱ्यांचे फोटो केले वायरल...
श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामसेवकाने उघड्यावर हागणदारी करणाऱ्यांचे फोटो केले वायरल...
श्रीरामपूर - तालुक्यातील गोंडेगाव या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक श्री.टि.के. जाधव यांनी गोंडेगाव शिवारात उघड्यावर शौचास बसणार्या ग्रामस्थांचे फोटो वायरल केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,आज दिनांक 17 ऑगस्ट 2021 रोजी पहाटे उघड्यावर शौचास बसणार्या ग्रामस्थांचे फोटो काढून ते सोशल मीडियावर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक टि.के. जाधव यांनी वायरल केले.या मध्ये काही महिलांचे देखील फोटो आहेत. या प्रकारामुळे गोंडेगावमध्ये मोठ्या प्रमाणावर उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.
उघड्यावर शौचास बसणार्या या ग्रामस्थांवर कोणती कारवाई होते.याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागून राहिले आहे.
ग्रामसेवक जाधव यांची सोशल मीडियावर हागनदारी करणाऱ्या ग्रामस्थांचे फोटो व्हायरल करण्याच्या पद्धतीमुळे श्रीरामपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.