शिवप्रहार न्यूज- श्री साईबाबा महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाचा शुभारंभ…

शिवप्रहार न्यूज- श्री साईबाबा महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाचा शुभारंभ…

श्री साईबाबा महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाचा शुभारंभ…

शिर्डी -

           श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने श्री साईबाबा महाविद्यालयात एमपीएससी, युपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शन वर्गांचा शुभारंभ संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांचे शुभहस्ते करण्यात आला. 

            सदरचा कार्यक्रम आज दिनांक १७ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.०० वाजता नविन शैक्षणिक संकुलात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना श्रीमती बानायत म्हणाल्या की, तुम्हा विद्यार्थ्यांच्यामध्ये स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी म्हणून याठिकाणी एमपीएससी व यूपीएससी स्पर्धा परीक्षाकरीता हे मार्गदर्शन वर्ग सुरु करण्यात येत आहेत. या वर्गांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. 

             या प्रसंगी संस्थानचे प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे, दिलीप उगले, कैलास खराडे, प्राचार्य विकास शिवगजे, अभयकुमार दुनाखे, गंगाधर वरघुडे, असिफ तांबोळी, शिल्पा पुजारी, रामनाथ चौधरी, दादा जांभुळकर, माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख अनिल शिंदे , रमेश पुजारी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

              डॉ.शिवाजी ढोकणे, प्रा मुबीन शेख यांनी सूत्रसंचालन केले. तर प्रा.नानासाहेब गुंजाळ यांनी आभार मानले.