शिवप्रहार न्युज-तरुण शेतकऱ्याकडुन ०२ लाखांची लाच घेतांना लाचखोर मंडलाधिकारी भालेकर लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला...

शिवप्रहार न्युज-तरुण शेतकऱ्याकडुन ०२ लाखांची लाच घेतांना लाचखोर मंडलाधिकारी भालेकर लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला...

तरुण शेतकऱ्याकडुन ०२ लाखांची लाच घेतांना लाचखोर मंडलाधिकारी भालेकर लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला...

  राहता – याबाबतची हकीकत अशी की, राहत्यातील मंडलाधिकारी जगन्नाथ भालेकर याने तरुण शेतकऱ्याला वडिलांनी खरेदी केलेल्या शेत जमिनीचे ७/१२ वर नाव लावायला तब्बल ३ लाखांची मागणी केली होती. त्यातील २ लाख रुपयांची रक्कम स्विकरताना नाशिकच्या लाचलुचपत पथकाने राहता येथील लाचखोर मंडल अधिकारी जगन्नाथ आसाराम भालेकर, रा-राहता याला २ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.

            याप्रकरणी राहता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतीबंधक विभाग,नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधिक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे, पोलीस उपअधीक्षक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभाकर निकम तसेच पोलीस हवालदार प्रफुल्ल माळी,पोलीस नाईक नितीन कराड ,प्रभाकर गवळी ,पोलीस हवालदार संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने लाचखोर मंडलाधिकारी भालेकर याला धरले.

लाचखोर मंडलाधिकारी भालेकर याला राहता न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने कोठडी सुनावली आहे.