शिवप्रहार न्यूज- कामिका एकादशीच्या निमित्ताने लाखो भाविकांनी घेतले माऊलींच्या "पैस" खांबाचे दर्शन…

शिवप्रहार न्यूज- कामिका एकादशीच्या निमित्ताने लाखो भाविकांनी घेतले माऊलींच्या "पैस" खांबाचे दर्शन…

कामिका एकादशीच्या निमित्ताने लाखो भाविकांनी घेतले माऊलींच्या "पैस" खांबाचे दर्शन…

नेवासा(प्रतिनिधी)संत ज्ञानेश्वर माऊलींची कर्मभूमी व ग्रंथराज ज्ञानेश्वरी व अमृतानुभव ग्रंथाचे रचनास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र नेवासा येथे कामिका वद्य एकादशीच्या यात्रेच्या निमित्ताने माऊलींचे मूर्तिमंत रूप असलेल्या पैस" खांबाचे दिवसभरात लाखो भाविकांनी दर्शन घेतले.यावेळी पुंडलीक वरदे...हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम च्या जयघोषाने नेवासे नगरी दुमदुमली होती.नावाचा जयघोष करत दर्शन घेतले. दर्शनासाठी पहाटे पासूनच तीर्थक्षेत्र नेवासानगरीत भाविकांची गर्दी झाली होती.

        एकादशीच्या निमित्ताने रविवारी दि.२४ जुलै रोजी पहाटे ४ च्या सुमारास वेदमंत्राच्या जयघोष करत संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख हभप गुरुवर्य शिवाजी महाराज देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत वैभव नहार व सौ.शीतल नहार, योगेश रासने व सौ.रुपाली रासने,वसंत रासने व सौ.सविता रासने यांच्या हस्ते माऊलींचे मूर्तिमंत रूप असलेल्या “पैस" खांबास सपत्नीक अभिषेक घालण्यात आला यावेळी झालेल्या धार्मिक विधीचे पौरोहित्य वेदशास्त्रसंपन्न आचार्य पांडूगुरू जोशी यांनी केले.

        एकादशीच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणाच्या बाहेर दर्शनबारी रांगेसह मुख दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती.एक किलोमीटर अंतरावर दर्शन रांग दिसत होती.तर मंदिर प्रांगणात आमदार शंकरराव गडाख मित्र मंडळ व पंचगंगा सिड्स कंपनीच्या वतीने बाळासाहेब शिंदे,काकासाहेब शिंदे,प्रभाकर शिंदे यांच्या वतीने आलेल्या भाविकांसाठी मोफत शाबुदाना खिचडी प्रसादाचे वाटप यावेळी करण्यात आले.मंदिराकडे येणाऱ्या वाटेवर रविराज तलवार,माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनेते मारुतराव घुले पाटील पतसंस्थेसह सर्व सुवर्णकार समाजाच्या वतीने संत नरहरी महाराज मंदिरात ही भाविकांनी खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले.