शिवप्रहार न्यूज- निपाणी वडगाव अंडरग्राउंड रेल्वे पुलाखाली पाणी साचल्याने नागरिक बेहाल..

शिवप्रहार न्यूज- निपाणी वडगाव अंडरग्राउंड रेल्वे पुलाखाली पाणी साचल्याने नागरिक बेहाल..

निपाणी वडगाव अंडरग्राउंड रेल्वे पुलाखाली पाणी साचल्याने नागरिक बेहाल...

निपाणी वडगाव - श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव या गावामध्ये रेल्वे रूळ ओलांडण्यासाठी नव्याने अंडरग्राउंड पुलाचे बांधकाम चालू आहे. गेल्या एक वर्षापासुन हे बांधकाम चालू असून कामाच्या अतिशय संथ गतीमुळे पावसाळ्यात नागरिकांचे प्रचंड हाल याठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे होत आहे.

        रेल्वे प्रशासनाने जर या अंडरग्राउंड पुलाचे काम लवकरात लवकर केले असते तर आज निपाणी वडगावकरांना अशा अडचणींना सामोरे जाण्याची वेळ आली नसती.तरी रेल्वे प्रशासनाने या पुलाखाली साचलेल्या पाण्याचा काहीतरी निचरा करून नागरिकांच्या होणाऱ्या हल्ल्यापासून त्यांची सुटका करावी अशी मागणी निपाणी वडगाव येथील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.