शिवप्रहार न्यूज -गुजरातच्या हिंदू मुली झाल्या सुरक्षित महाराष्ट्रातल्या कधी होणार...

शिवप्रहार न्यूज -गुजरातच्या हिंदू मुली झाल्या सुरक्षित महाराष्ट्रातल्या कधी होणार...

गुजरातच्या हिंदू मुली झाल्या सुरक्षित महाराष्ट्रातल्या कधी होणार...

 श्रीरामपूर/ मुंबई -गुजरात राज्यामध्ये राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी “लव्ह जिहाद” विरोधी कायद्याला मंजुरी दिल्याने आज दिनांक 15 जून पासून हा कायदा लागू झाला आहे. मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी हा निर्णय घेतला आहे.लव्ह जिहाद विरोधी कायदा हा गुजरात सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात पास केला होता.

        हिंदू मुलींचे अपहरण व धर्मांतर थांबवण्यासाठी गुजरात सरकारने लव्ह जिहाद विरुद्ध कायदा केल्याचे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाने यांनी यावेळी सांगितले.या कायद्यामध्ये ०७ वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे.

       यामुळे आता धर्मांतर करण्याच्या हेतूने,आमिषे दाखवून,जबरदस्तीने हिंदू मुलींना लव्ह जिहाद च्या जाळ्यात अडकवता येवु शकणार नाही.या कायद्यामुळे गुजरातमधील हिंदू मुली सुरक्षित झाल्या असून आता महाराष्ट्रातल्या हिंदू मुलींबद्दल विचार होणे आवश्यक आहे.

        उत्तर प्रदेश ,मध्य प्रदेश नंतर आता गुजरात सरकारने देखील लव्ह जिहाद विरोधी कायदा लागू केल्यामुळे महाराष्ट्रातील हिंदू जनतेने याबद्दल मागणी करून सरकारकडून हा कायदा लागू करुन घेणे जरुरीचे बनले आहे.