शिवप्रहार न्यूज- काल रात्री श्रीरामपुरात वीज पडली…

शिवप्रहार न्यूज- काल रात्री श्रीरामपुरात वीज पडली…

काल रात्री श्रीरामपुरात वीज पडली…

 श्रीरामपूर - काल रात्री श्रीरामपूर शहर व तालुक्यात विजाच्या कडकडाटासह, वादळी वाऱ्यासह प्रचंड मुसळधार पाऊस पडला.यावेळी श्रीरामपूर शहरात विजांच्या कडकडाटाचा आवाज झाल्याने कुठेतरी वीज पडल्याची चर्चा होती.

      दरम्यान ही वीज श्रीरामपूर शहरातील गुरुनानकनगर गेटवरील विजेच्या एका खांबावर पडली आणि त्यामुळे त्या ठिकाणी जाळ निर्माण झाला.परंतु वीज पडल्यामुळे कुठल्याही प्रकारची हानी झाली नाही.