शिवप्रहार न्यूज- पालकमंत्री राधाकृष्ण ना.विखेंची बदनामी,माजी नगराध्यक्षाच्या घरी दार तोडून चाकू लावून लुटले गुन्हा दाखल 

शिवप्रहार न्यूज- पालकमंत्री राधाकृष्ण ना.विखेंची बदनामी,माजी नगराध्यक्षाच्या घरी दार तोडून चाकू लावून लुटले गुन्हा दाखल 

पालकमंत्री राधाकृष्ण ना.विखेंची बदनामी,

माजी नगराध्यक्षाच्या घरी दार तोडून चाकू लावून लुटले गुन्हा दाखल 

श्रीरामपूर/नगर (शिवप्रहार न्यूज)- नगर शहरात संभाजीनगर रस्ता (जुना औरंगाबाद रस्ता) येथील येथील घुले फार्म हाऊस पोखर्डी शिवार येथे राहणारे स्व.माजी नगराध्यक्ष शंकरराव घुले यांच्या निवासस्थानी काल रात्री साडेअकरा ते पहाटे तीनच्या दरम्यान दोन चोरटे बंगल्यासमोर आले. त्यांनी पाठीमागील दरवाज्याची ग्रील तोडून घरात घुसून वरच्या मजल्यावरील बेडरूमचा दरवाजा तोडून घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम लुटले यावेळी भाग्यश्री अभिषेक घुले या तरुण विवाहितेला चोरट्यांनी पायावर कशाने तरी फटका मारून जबर जखमी केले. तर श्रीमती शारदाताई शंकरराव घुले यांना तू जर आवाज केला तर तुला भोसकून टाकील असे म्हणत पोटाला चाकू लावला तरी देखील धाडस दाखवत श्रीमती शारदाताई घुले मोठमोठ्याने ओरडल्या तेव्हा चोरटे पळून गेले. चोरट्यांनी पाच हजाराची रोकड व दीड लाखाचे सोन्याचे दागिने असा सुमारे पावणेदोन लाखाचा ऐवज मारहाण करून लुटून नेला. या घटनेने नगर शहरात खळबळ उडाली असून श्रीमती शारदा शंकरराव घुले या वृद्ध महिलेने एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिल्यावरून दोन अज्ञात आरोपींविरुद्ध भादंवी कलम 394, 397, 34 प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळी, डीवायएसपी अजित पाटील, सपोनि आठरे यांनी भेट दिली. पोसई चा चाहेर हे चोरट्यांचा शोध घेत आहे. 

दरम्यान दुसऱ्या घटनेत दरम्यान राहता तालुक्यातील लोणी पोलिसांत राज्याचे महसूल मंत्री पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभाग खात्याचे मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांची त्यांच्याच मोबाईल नंबर वर व्हाट्सअप वर जनमानसात असलेली प्रतिमा मलिन होईल, बदनामी होईल अशा प्रकारे अपमानास्पद आपत्ती जनक मजकूर प्रसारित केला व दोन कार्यकर्त्यांच्या गटांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी लोणी पोलिसांत प्रमोद दत्तात्रय राहणे धंदा-विशेष कार्यकारी अधिकारी ना.राधाकृष्ण विखे पाटील कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या फिर्यादीवरून लोणी पोलिसांत आरोपी मोबाईल नंबर 98 50 91 0188 हा नंबर वापरणारा व त्या ट्रू कॉलरवर नाव येते ते सुनील राऊत यांच्याविरुद्ध भादंवि कलम 153 (अ), 500, 504, 505(2), 507 प्रमाणे लोणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सपोनी पाटील पुढील तपास करीत आहे. आरोपी वापरत असलेल्या मोबाईल वरून त्याने व्यक्तिगत मंत्र्यांच्या मोबाईल नंबर वर प्रतिमा मलीन करणारा बदनामीकार मजकूर प्रसारित केला. या घटनेची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.