शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर शहरात चायना मांजा विकणाऱ्यांवर नगरपालिकेकडुन कारवाई…

श्रीरामपूर शहरात चायना मांजा विकणाऱ्यांवर नगरपालिकेकडुन कारवाई…
श्रीरामपूर- श्रीरामपूर शहरात नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री.गणेश शिंदे यांनी चायना मांजावर बंदी घातली आहे.तरीदेखील काही व्यवसायिक अशा मांजाची विक्री करत असल्यामुळे नगरपालिकेच्या पथकाने त्यांच्यावर कारवाई करून दोन दिवसात जवळपास वीस पेक्षा जास्त चायना मांजा आसरी जमा केल्या आहेत.
या चायना मांजामुळे मनुष्य, पशु,पक्षी यांना प्राणघातक इजा होऊ शकते.त्यामुळे ही कारवाई चालू आहे.या पथकात नगरपालिकेचे आरोग्य विभाग प्रमुख रावसाहेब घायवट, स्वच्छता निरीक्षक संजय आरणे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.