शिवप्रहार न्यूज -श्रीरामपूरच्या महिला पोलीस हवालदार शबनम दिलावर शेख यांचे निधन...
श्रीरामपूरच्या महिला पोलीस हवालदार शबनम दिलावर शेख यांचे निधन...
श्रीरामपूर -श्रीरामपूरच्या रहिवासी कर्जत पोलिस ठाण्याच्या पोलिस हवालदार श्रीमती शबनम दिलावर शेख यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. शबनम या 2006 च्या पोलीस भरती परीक्षेत उत्तीर्ण होऊन पोलीस दलात भरती झाल्या होत्या. त्या एक उत्तम खेळाडू होत्या.त्यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त श्री.कृष्णप्रकाश, आयपीएस श्रीमती ज्योतिप्रिया सिंग यांच्याबरोबर अनेक कामगिरी मध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. प्रेमळ स्वभाव आणि सर्वात मिळून-मिसळून राहणे अशी त्यांची ओळख होती. शबनम या अखिल भारतीय पोलीस क्रिडा स्पर्धेमध्ये बॉक्सिंग जुडो या प्रकारात पदक विजेत्या आहेत. त्यांच्या परिवारात आई-वडील, दोन भाऊ व तीन बहिणी यांचा सामावेश आहे. त्यांच्या निधनाने नगर जिल्हा पोलीस दलात व श्रीरामपूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.