शिवप्रहार न्युज - ०६ बुलेट मोटार सायकल व ०२ ट्रॅक्टर चोरी करणारी आरोपींची टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद…

शिवप्रहार न्युज -  ०६ बुलेट मोटार सायकल व ०२ ट्रॅक्टर चोरी करणारी आरोपींची टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद…

०६ बुलेट मोटार सायकल व ०२ ट्रॅक्टर चोरी करणारी आरोपींची टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद…

 नगर-प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक 01/07/2023 रोजी फिर्यादी श्री. राजु रोहिदास ठोकळ वय 54, रा. धुत शोरुम मागे, विनायक नगर, अहमदनगर यांनी घरा जवळ लावलेली 50,000/- रुपये किंमतीची रॉयल इनफिल्ड कंपनीची बुलेट मोटार सायकल अनोळखी आरोपींनी चोरुन नेली होती. सदर घटने बाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी बाबत कोतवाली पोलीस स्टेशन 723/2023 भादविक 379 प्रमाणे मोटार सायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मा. श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना ना उघड चोरीचे गुन्हे उघडकिस आणणे बाबत आदेश दिले होते.

 नमुद आदेशा प्रमाणे पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ/मनोहर गोसावी, पोना/रविंद्र कर्डीले, भिमराज खर्से, संदीप दरदंले, संतोष खैरे, फुरकान शेख, विजय ठोंबरे, पोकॉ/जालिंदर माने, अमृत आढाव, मेघराज कोल्हे व चापोकॉ/अरुण मोरे अशा पोलीस अंमलदार यांचे पथक नेमुण ना उघड मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकिस आणणे बाबत सुचना देवुन पथकास तात्काळ रवाना केले. पथक नगर शहर परिसरात फिरुन आरोपींची माहिती घेताना पोनि/श्री. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, इसम नामे वैभव सुरोडे, रा. आष्टी, जिल्हा बीड याने अहमदनगर शहरातील विनायक नगर येथुन चोरी केलेली बुलेट मोटार सायकलवर साथीदारासह शेवगांव मार्गे, ब्राम्हणी, ता. राहुरी येथील किरण गर्जे व सोमनाथ हारेल यांना देण्यासाठी येणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन, पंचाना सोबत घेवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या.

 पथकाने लागलीच शेवगांव - गेवराई रोडवरील नित्यसेवा हॉस्पीटल जवळ सापळा लावुन थांबलेले असताना 09.00 वा. सुमारास दोन इसम काळ्या रंगाच्या विनानंबर बुलेट मोटार सायकलवर येताना दिसले. पथकाची खात्री होताच बुलेटवरील इसमांना थांबण्याचा इशारा करताच त्यांनी ताब्यातील बुलेट रस्त्याचे कडेला थांबवली. बुलेटवरील दोन्ही इसमांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) वैभव ऊर्फ सोमा बाबासाहेब सुरोडे, वय 25, रा. मातकुळी, ता. आष्टी, जिल्हा बीड व 2) किरण अंबादास गर्जे, वय 25 रा. चिलेखनवाडी, ता. नेवासा असे असल्याचे सांगितले. 

      त्यांना ताब्यातील बुलेट बाबत विचारपुस करता त्यांनी ताब्यातील बुलेट अहमदनगर शहरातील विनायक नगर येथुन चोरी केली असुन ब्राम्हणी, ता. राहुरी येथील किरण गर्जे व त्याचे काका सोमनाथ हारेल यांना देण्यासाठी जात असल्याची कबुली दिली. ताब्यातील आरोपींना अधिक विश्वासात घेवुन सखोल व बारकाईने विचारपुस करता त्यांनी त्याचे इतर साथीदार नामे 3) दादा मोरे, रा. कोपरगांव, 4) विशाल सदगिर, रा. धोंडाबे, जिल्हा नाशिक, 5) आद्दु शेख रा. जामखेड, 6) महेश सुनिल सोनवणे, रा. नॉर्दन ब्रॅच, श्रीरामपूर, 7) किरण अंबादास गर्जे, रा. चिलेखनवाडी, ता. नेवासा व 8) सोमनाथ सुभाष हारेल, रा. ब्राम्हणी, ता. राहुरी यांचे सोबत अहमदनगर, बीड, नाशिक व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातुन बुलेट व ट्रॅक्टर चोरी केल्याची माहिती दिल्याने अहमदनगर, बीड, नाशिक व छत्रपती संभाजीनगर जिल्हा गुन्हे अभिलेख पडताळणी करता खालील प्रमाणे आठ गुन्हे उघडकिस आले आहेत.

अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम

1. कोतवाली गु.र.नं. 723/23 भादविक 379

2. संगमनेर तालुका गु.र.नं. 306/23 भादविक 379

3. संगमनेर शहर गु.र.नं. 448/23 भादविक 379

4. संगमनेर शहर गु.र.नं. 265/23 भादविक 379

5. आष्टी, जिल्हा बीड गु.र.नं. 39/23 भादविक 379

6. कन्नड शहर, छत्रपती संभाजीनगर गु.र.नं. 102/23 भादविक 379

7. वैजापुर, छत्रपती संभाजीनगर गु.र.नं. 229/23 भादविक 379

8. वावी, जिल्हा नाशिक गु.र.नं. 254/23 भादविक 379

ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपींचे कब्जातुन 14,00,000/- रुपये किंमतीचे महिंद्रा व जॉन डिअर कंपनीचे दोन ट्रॅक्टर व 10,80,000/- रुपये किंमतीच्या रॉयल इनफिल्ड कंपनच्या सह बुलेट मोटार सायकल असा एकुण 24,80,000/- रुपये किंमतीचे मुद्देमालासह ताब्यात घेवुन कोतवाली पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन करीत आहे.

        सदर कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व मा. श्री. अनिल कातकाडे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.