शिवप्रहार न्यूज- मुल्ला कटरच्या दोन साथीदारांना आज पहाटे मालेगावात धरले…
मुल्ला कटरच्या दोन साथीदारांना आज पहाटे मालेगावात धरले…
श्रीरामपूर- शहरातील इमरान कुरेशी याचे दोन साथीदार पप्पू गोरे व सचिन पगारे,रा-वार्ड नंबर -०२ ,श्रीरामपूर यांना श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने आज शुक्रवारी पहाटे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात धरले व श्रीरामपूरला आणण्यात आले आहे.मुल्ला कटर व त्याच्या साथीदारांविरोधात अल्पवयीन मुलींसोबत लग्न करणे,त्यांना वेश्या व्यवसायास लावणे,त्यांना धर्मांतरित करणे,त्यांच्यावर बलात्कार करणे यासारखे गंभीर आरोप आहेत.
मुल्ला कटर व त्याच्या साथीदारांविरोधात चार ते पाच गुन्हे आतापर्यंत दाखल झालेले असून त्याचा तपास पोलिसांकडून चालू आहे.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री.मनोज पाटील, श्रीरामपूर विभाग अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर ,डिएसपी.संदीप मिटके व शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.बोरसे व त्यांच्या पथकातील पोलीस कर्मचारी गौतम लगड ,रमेश गावडे ,रमिझ अख्तार यांनी केली.