शिवप्रहार न्यूज - कामगारांच्या आंदोलनाचा आज ०६ वा दिवस;काल एकाची प्रकृती खालावल्याने कामगार रुग्णालयात दाखल …

शिवप्रहार न्यूज - कामगारांच्या आंदोलनाचा आज ०६ वा दिवस;काल एकाची प्रकृती खालावल्याने कामगार रुग्णालयात दाखल …

कामगारांच्या आंदोलनाचा आज ०६ वा दिवस;काल एकाची प्रकृती खालावल्याने कामगार रुग्णालयात दाखल …

श्रीरामपूर- सनफ्रेश ऍग्रो /लॅक्टॅलीस/प्रभातच्या कामगारांचे प्रभात डेअरी समोर, श्रीरामपूर येथे “शिवप्रहार प्रतिष्ठानच्या” नेतृत्वाखाली धरणे आंदोलन -आमरण उपोषण चालू आहे.त्याचा आज सहावा दिवस उजाडला असून अजून पर्यंत कंपनी प्रशासनाकडून यावर तोडगा निघालेला नाही.

      दरम्यान काल आमरण उपोषणकर्त्या श्री.संपत इल्ले या कामगाराची उपोषणामुळे चक्कर येऊन प्रकृती खालावल्याने व तो बेशुद्ध पडल्याने त्यांना ॲम्बुलन्सद्वारे साखर कामगार रुग्णालय, श्रीरामपूर शहर येथे दाखल करण्यात आले आहे.डॉक्टरांनी त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले.

       तसेच काल सायंकाळच्या सुमारास शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री.सदाशिव लोखंडे यांनी कामगारांच्या आंदोलनाला भेट देऊन त्यांच्या भावना समजून घेतल्या व लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.तसेच गेल्या दोन दिवसापासून राज्याचे महसूल मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे शिष्टमंडळ- दीपक अण्णा पटारे, गिरधर तात्या आसने, संदीप चव्हाण यांच्याकडूनदेखील कंपनीच्या मॅनेजमेंट सोबत व कामगारांच्या प्रतिनिधी सोबत चर्चा करून तोडगा काढण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहे.

      तसेच “शिवप्रहार प्रतिष्ठानच्या” वतीने आंदोलनकर्त्या कामगारांच्या भावना राज्याचे कामगार मंत्री श्री.सुरेश खाडे यांच्यापर्यंत देखील फोनद्वारे पोहोचवण्यात आल्या आहे त्यांनी देखील तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.

      आज सोमवार दि.३१ हा धरणे आंदोलनाचा सहावा दिवस व आमरण उपोषणाचा चौथा दिवस असल्याने काही कामगारांची प्रकृती आणखी खालवण्याची शक्यता आहे.तरी कंपनीने लवकरात लवकर तोडगा काढावा अन्यथा कोण्या कामगाराच्या जीवाचे बरे-वाईट झाले तर कंपनीला सर्वस्वी जबाबदार धरले जाईल असे कामगारांच्या वतीने सांगण्यात आले आहे. 

तसेच या आंदोलनास जवळपास सर्व पक्ष व अनेक संघटनांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.