शिवप्रहार न्युज - कॅफेत अश्लील चाळे;मालक-चालकाविरोधात गुन्हा दाखल…

शिवप्रहार न्युज -  कॅफेत अश्लील चाळे;मालक-चालकाविरोधात गुन्हा दाखल…

कॅफेत अश्लील चाळे;मालक-चालकाविरोधात गुन्हा दाखल…

अहिल्यानगर - शहरातील कोर्ट परिसरातील द परफेक्ट कॅफेवर कोतवाली पोलिसांनी छापा टाकून अश्लील चाळे करणारे तरुण- तरुणींना ताब्यात घेतले.कॅफेमध्ये पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी चहा व कॉफीचे साहित्य मिळून आले नाही.मात्र कॅफेच्या आतील बाजूस छोटे-छोटे कंपार्टमेंट तयार करून त्यात मुले-मुली अश्लील चाळे करताना मिळून आले.

       याप्रकरणी पोलिसांनी कॅफेचा मालक महेश पोपट खराडे, राहणार- केडगाव व चालक अनुज शिवप्रसाद कुमार,सध्या राहणार- नगर, मूळ राहणार -उत्तर प्रदेश यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.