शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर परिसरात छापा ! ६॥ कोटीची पावडर पकडली !

शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर परिसरात छापा ! ६॥ कोटीची पावडर पकडली !

श्रीरामपूर परिसरात छापा ! 

६॥ कोटीची पावडर पकडली !

श्रीरामपूर ( शिवप्रहार न्युज ) -श्रीरामपूर - शहरालगत असलेल्या रांजणखोल परिसरात ६कोटी ५० लाखांचा दुध पावडर साठा अन्न व औषध प्रशासनाने पकडला ! एका छोट्या गावात साडेसहा कोटींचा दुध पावडर साठा पकडल्याने खळबळ उडाली असून ही पावडर नेमकी कशासाठी वापरली जायची ? तीचा दुधात भेसळीसाठी वापर केला जायचा का ? अशी उलट सुलट चर्चा सुरु असून या छाप्याची अधिक माहीती अशी की, मे. श्री entrprises, 106 रांजनखोल, ता. राहता जि. अहमदनगर या ठिकाणी sunfresh ऍग्रो इंडस्ट्री प्रा. लि. या कंपनीने विनापरवाना साठविलेला सुमारे 6 कोटी 50 लाख रुपये किमतीचा दूध पावडर व व्हे पावडरचा साठा अन्न व औषधं प्रशासन मार्फत कारवाई करून जप्त करण्यात आला.    

       अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन करीत असल्यामुळे सदर कारवाई घेण्यात आली.कार्यवाही दरम्यान कंपनीच्या वतीने हजर झालेल्या अधिकाऱ्यांनी सदर साठ्याबाबत कोणताही समाधानकारक खुलासा केला नाही अथवा कोणतीही कागदपत्रे सादर केली नाहीत.सदर कारवाई अन्न व औषधं प्रशासन,नगर येथील अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे यांनी सहाय्यक आयुक्त प्रमोद काकडे, अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार व नमुना सहाय्यक अधिकारी प्रसाद कसबेकर यांचेसमवेत केली.अन्न नमुने अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.