शिवप्रहार न्यूज-गोंधवणी येथील अवैध गावठी हातभट्टी दारू अड्डे उद्ध्वस्त करुन साडे सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त;Dysp संदीप मिटके व राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्या संयुक्त पथकाची कारवाई…
गोंधवणी येथील अवैध गावठी हातभट्टी दारू अड्डे उद्ध्वस्त करुन साडे सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त;Dysp संदीप मिटके व राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्या संयुक्त पथकाची कारवाई…
श्रीरामपूर-Dy.s.p. संदीप मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत गोंधवणी परिसरात, वडारवाडा येथे गावठी हातभट्टी दारूअड्डे व हातभट्टी दारू तयार करत आहेत. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन छापा टाकून सदर परिसरातील सर्व गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावरील कच्चे रसायन, 7800 लिटर ,तयार गावठी हातभट्टी दारू 248 लिटर व तसेच 50 किलो नवसागर , देशी दारू, तसेच 450 किलो गुळ एक टेंपो व एक दुचाकी असा एकूण 6,43,955 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे . त्यानुसार,
1) श्रीकांत प्रभाकर काळे, रा .कदम वस्ती श्रीरामपूर
2) सागर माणिक शिंदे, रा. गोंधवणी ता श्रीरामपूर
3) भीमराव काळे ,रा अशोक नगर ता श्रीरामपूर
4) दत्तात्रेय जानकीराम मंचरे, रा वैजापूर
5) दीपक वसंत शेलार ,रा अशोक नगर
6) अशोक काशिनाथ शिंदे( फरार)
7) बाप्पू नागू गायकवाड ( फरार)
8) अर्जुन फुलारे ( फरार) सर्व राहणार -गोंधवणी ,वडारवाडा ता.श्रीरामपूर यांचेविरुध्द महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 65(फ) ( क) ,( ड), ( इ) नुसार P.C. नितीन शिरसाठ यांचे फिर्यादीनुसार श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन व राज्य उत्पादन शुल्क कार्यालय श्रीरामपूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा. डॉ. दिपाली काळे, मा.गणेश पाटील ,पोलीस अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांचे मार्गदर्शनाखाली Dy.s.p संदीप मिटके, Dy s.p. नितेश शेंडे ( राज्य उत्पादन शुल्क),P.I. कोल्हे, P.I. हुलगे, P.I, वाजे व इतर अधिकारी व अंमलदार आदींनी केली.