शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरात खुन्नसवरून एकावर चाकूने वार...
श्रीरामपुरात खुन्नसवरून एकावर चाकूने वार...
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- खुन्नस का देतो असे म्हणत एकावर चाकूने वार करण्याचा प्रकार श्रीरामपूर शहरात घडला आहे. याबाबत १७ वर्षीय शिक्षण घेणाऱ्या युवकाने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आपण रेल्वे गेटजवळील ग्राउंडवर क्रिकेट खेळायला जायचो तेव्हा वॉर्ड नं.२ मध्ये राहणाऱ्या मोहसीन (पुर्ण नाव माहीत नाही) याच्याशी आपले किरकोळ कारणावरून भांडण झाल होते. ते आपण त्याचवेळी आपसात मिटवले होते.
परंतू, २७ नोव्हेंबरला सायंकाळी मी व माझा चुलत भाऊ घराजवळील सायकल दुकानाजवळ असताना मोहसीन हा तेथे स्कुटीवर दोन जणांना घेवून आला व त्याने गचांडी पकडून तू का खुन्नस देतो ? असे विचारले. तेव्हा आपण तुला खुन्नस देत नाही असे समजावून सांगत असताना मोहसीन व दोघांनी मारायला सुरूवात केली. आपण त्यांना प्रतिकार करत असताना मोहसीनने खिशातून चाकू काढून आपल्या पोटावर वार केले. त्यात आपण जखमी झाल्याचे फिर्यादीत म्हटले असून सदर फिर्यादीवरून मोहसीन (पुर्ण नाव माहीत नाही), रा. वॉर्ड नं.२ व दोन अनोळखी पोरं यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोनि. नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करीत आहेत.