शिवप्रहार न्युज - श्रीरामपूर शहराजवळील सुभाषवाडी मध्ये बिबट्याचा धुमाकूळ…
श्रीरामपूर शहराजवळील सुभाषवाडी मध्ये बिबट्याचा धुमाकूळ…
श्रीरामपूर(शिवप्रहार न्युज)- श्रीरामपूर शहराजवळ असलेल्या सुभाषवाडी परिसरामध्ये एका बिबट्याने आज दि.२७ नोव्हेंबर रोजी बुधवारी सायंकाळच्या सुमारास संदीप भोसले बंडू नावाच्या व्यक्तीवर हल्ला केला. यामध्ये या व्यक्तीच्या पायाला चावा घेतल्याने जखम झाली आहे. तसेच या बिबट्याने एका लहान मुलावर देखील हल्ला करत त्याला नख मारले. ही घटना श्रीरामपूर शहराजवळील विद्यानिकेतन शाळेपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या सुभाषवाडी येथे घडली आहे. येथील नागरिकांनी तात्काळ पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.