शिवप्रहार न्युज - चिलीमसह पकडल्याने गांजा पिणाऱ्यांची दमछाक !जिल्हाभर पोलिसांची धडक कारवाई ! 

शिवप्रहार न्युज - चिलीमसह पकडल्याने गांजा पिणाऱ्यांची दमछाक !जिल्हाभर पोलिसांची धडक कारवाई ! 

चिलीमसह पकडल्याने गांजा पिणाऱ्यांची दमछाक !जिल्हाभर पोलिसांची धडक कारवाई ! 

नगर /श्रीरामपूर /शिर्डी / (शिवप्रहार न्यूज )-गांजा हा ओढून पिल्यामुळे शरीराला छातीला आजार होतात, छाती खोकड होते.तरी सर्वत्र गांजा पिणारे चोरून लपून गांजा पितातच मात्र आता जिल्हा पोलीस यंत्रणेने गांजा पिणाऱ्यांनाच पकडण्याची मोहीम सुरू केली आहे.गांजा पिताना चिलीम सह पकडले गेल्याने पकडलेल्या गांजा पिणाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली असून दम मारो दम म्हणारे पोलीसांचे कारवाई ने घाबरले आहेत .

    गांजा हा आमली पदार्थ पिताना पकडलेल्यावर एनडीपीएस कायद्या कलमाप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले. एस पी राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर पोलिसांनी ठिकठिकाणी गांजा पिणाऱ्यांना पकडून कारवाई केली .त्यात श्रीरामपूर शहर पोलिसांनी पाटाच्या कडेला बबन हनीफ शेख ,रा.वार्ड नंबर एक याला गांजा पिताना पकडले तर रेल्वे लाईन जवळ वासीम आब्बास शेख, रा वार्ड नं १नंबर याला गांजा पिताना पकडले. पोलीस निरीक्षक गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.तर श्रीरामपूर तालुका पोलिसांनी टाकळीभान परिसरात घुमनदेव रोड येथे राजेंद्र पडोळे ,राहणार बेल पिंपळगाव याला पकडले .सपोनिथोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली .

     श्रीक्षेत्र असलेल्या शिर्डीतही पोलिसांनी वाहन पार्किंगच्या मोकळ्या जागेत गांजा पिताना भगवान जयस्वाल, उमेश राघव शेट्टी ,गणेश मनोहर क्षीरसागर ,सर्व राहणार- ठाणे यांना पकडले .पोनि पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलिसांनी कारवाई केली .अकोले पोलिसांनीही दशक्रिया ओट्याजवळ सेवाराम राजाभर याला पकडले. कुंभारवाडा प्रवारा नदीच्या दहाव्याच्या ओट्याजवळ गणेश वाघचौरे ,विजय पानसे या तिघांना पकडण्यात येऊन सपोनि घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई झाली .तर राजुर पोलिसांनी ग्रामपंचायत च्या मागे दिनकर देशमुख ,राजेंद्र जाधव, शिवा सिंग यांना गांजा पिताना पकडले .सपोनि इंगळे यांच्या सूचनेप्रमाणे हे गांजा पिणारे पकडण्यात आले .

       तर नेवासा पोलिसांनी बाजार तळावर छबुराव बाकले ,जुन्या डाग बंगल्याच्या मागे कुकाण्यात संभाजी पवार ,अर्जुन जाधव ,अशोक गुंजाळ यांना गांजा पिताना पकडले .पोलीस निरीक्षक करे यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा पोलिसांनी हे गंजडी पकडले. भिंगार कॅम्प पोलीसही गांजाच्या कारवाई पुढे असून त्यांनी महादेव मंदिराच्या बाजूला काठवण भागात गांजा पिताना संतोष तोमर ,फारूक अली शेख या दोघांना पकडले सपोनि देशमुख यांच्या सूचनेप्रमाणे ही कारवाई झाली .कोपरगाव शहर पोलिसांनी कारवाई करत प्रवरा नदीच्या कडेला राहूल डाके , अशोक कसबे यांना पकडले पोनि देसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई झाली तर कोपरगाव तालुका पोलिसांनीही साखर गेट समोर बारकू लोंढे ,नानासाहेब खैरनार यांना गांजा पिताना पकडले, सुरेगाव पाटाच्या कडेला मच्छिंद्र शिंदे याला पकडण्यात आले पोनि जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. जामखेड येथे टॉकीज च्या मागे प्रशांत गंगावणे याला पकडण्यात आले पोनि गायकवाड यांच्या सूचनेप्रमाणे ही कारवाई झाली तर संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलीस स्टेशन चे पोनिभोये यांच्या पोलीस पथकांनी मंदिराच्या आडोशाला आकाश गायकवाड व राकेश मोरे या दोघांना गांजा पिताना पकडले .

     एकंदरच जिल्हाभर गांजा पिणाऱ्यांची धरपकड सुरू असल्याने गांजा पिणाऱ्यांना दमछाक झाला असून त्यांच्यात खळबळ उडाली आहे.प्रत्येक ठिकाणी गांजा पिणारे मिळून आले त्यामुळे जिल्ह्यात गांजाची विक्री ही मोठ्या प्रमाणात होत असल्याचे या कारवाईतून उघड झाले आहे आता गांजा विक्रेते कोण ? याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे पोलिसांच्या कारवाईचे जनतेतून जोरदार स्वागत होत आहे . विशेष म्हणजे ३१ डिसेंबर पूर्वीच हा कारवाई चा ' धडाका ' सुरु झाला .