शिवप्रहार न्यूज- दिव्यांग तरुणीवरील अत्याचाराचा आधार दिव्यांग संघटनेच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देवून निषेध…
दिव्यांग तरुणीवरील अत्याचाराचा आधार दिव्यांग संघटनेच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देवून निषेध…
श्रीरामपूर :-
नुकतेच नगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील दिव्यांग असलेल्या तरुणीवर तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन सोनेसांगवी, ता. शेवगाव येथील गणेश मडके नामक इसमाने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. ही बाब माणुसकीला काळीमा फासणारी असुन आरोपीवर तात्काळ कठोर कारवाई व्हावी यासाठी अपंग सामाजिक कल्याण व पुनर्वसन संस्था, श्रीरामपूर संचलित आधार दिव्यांग संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज (दि.१६) रोजी तहसीलदार प्रशांत पाटील यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात सदर घटना ही माणुसकीला व लोकशाहीला काळीमा फासणारी असुन आजरोजी दिव्यांग असुरक्षित जीवन जगत आहे. शासन वेळोवेळी कायदे व योजना करतात मात्र त्याची कठोर अंमलबजावणी होत नसल्याने अशा प्रकारच्या निच घटना होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. सदर घटनेतील दिव्यांग पीडित तरुणीला शासनाकडून सर्वोतोपरी मदत मिळावी म्हणून विनंती करण्यात आली आहे. अन्यथा न्यायासाठी आधार दिव्यांग संघटना रस्त्यावर उतरतील असेही सदर निवेदनात म्हटले आहे.
यावेळी तहसीलदार यांना निवेदन देताना आधार दिव्यांग संघटना अध्यक्ष लक्ष्मण खडके, पीआरओ रामभाऊ डमाळे, चांद सय्यद, तालुकाध्यक्ष भारत चौधरी, शहराध्यक्ष सुमित रहिले, श्रीरामपूर तलाठी घोरपडे भाऊसाहेब, जमीर पठाण, आकाश शिंदे, भास्कर शिंदे, राम लोंढे, फिरदोस शेख, सादिक शेख आदी दिव्यांग मोठ्या संख्येने उपस्थित होते.