शिवप्रहार न्यूज-एसपी राकेश ओलांचे आदेशाने जिल्हयात अवैध धंद्यांवर गुन्हे शाखेची धडक कारवाई ! जनतेतून स्वागत !
एसपी राकेश ओलांचे आदेशाने जिल्हयात अवैध धंद्यांवर गुन्हे शाखेची धडक कारवाई ! जनतेतून स्वागत !
संगमनेर / शिर्डी / नगर ( शिवप्रहार न्युज ) - नगर जिल्ह्याचा चार्ज घेतल्यानंतर एसपी राकेश ओला यांनी अवैध धंद्यांवर ठोस कारवाईचे आदेश दिले त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांनी व त्यांचे पथकाने धडक कारवाई करत गुन्हे दाखल केले. संगमनेरात देवी गल्ली, लखमीपुरा येथे इमारतीच्या पार्किग मध्ये छापा टाकूण मटका जुगार खेळणाऱ्या ११ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला.येथे १ लाख ६४ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
तर कोपरगांव परिसरात टाकळी फाटा येथे छापा टाकूण पत्यावर पैसे लावून तीरट जुगार खेळणार्यांना पकडण्यात आले .येथे २३ लाखाहुन जादा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर २६ जुगारी आरोपींना पकडण्यात आले.त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
नगर शहरात रेशनचा काळया बाजारात जाणारा गरीबांचा तांदूळ गुन्हे शाखेने पकडला संगमनेर,राहुरी,कोपरगांव, श्रीरामपूर, शेवगांव, श्रीगोंदा ,पारनेर ,जामखेड आदि भागात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापे टाकूण अवैध धंद्यांवर धडक कारवाई केली .
मागच्या आठवड्यात संगमनेर, श्रीरामपूर, ममदापूर, नगर शहर येथे गोमांस पकडून कडक कारवाई करण्यात आली एकंदरच नवे एसपी राकेश ओला यांच्या निर्देशाने जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध धंद्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईचे सर्वसामान्य जनतेतून स्वागत होत आहे . तर बेकायदा धंदे करणारे व त्यांना मदत करणाऱ्यांचे पोट दुखुन धाबे दणाणले आहेत .